फुलचंद जंगलू शेंडे, रामा जंगलू शेंडे, देवराम नारायण शेंडे व उमेंद्र शिवचरण बोरकर (सर्व रा. सुकडी) यांनी वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केले होते. याबाबत सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्प) यांनी रितसर सुनावणी घेऊन अतिक्रमण निष्कासनाचे आदेश जारी केले होते. या आदेशाची प्रत देऊन व कार्यालयाकडून अतिक्रमण काढण्याची त्यांना अनेकदा सूचना देण्यात आली होती. तरी त्यांनी अतिक्रमण न काढल्याने वन विभागाला बळाचा वापर करावा लागला. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक आर.आर. सदगीर, तिरोडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.के. आकरे, नायब तहसीलदार ए.टी.व्हनकडे, सुकडीचे सरपंच जे.व्ही.गभणे, पोलीस पाटील एम.टी. चौधरी, उपसरपंच एन.एस. बावनथडे, तिरोडाचे सर्व क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक, संरक्षक पथक, गोंदियाचे वनकर्मचारी, पोलीस दल, एसटीपीएफ कर्मचारी, एनएनटीआर व तिरोडा वनपरीक्षेत्रातील वनमजूर उपस्थित होते.
सुकडीतील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST