शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निधी मागणीचे प्रस्ताव त्वरित सादर करा : धर्मरावबाबा आत्राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 17:03 IST

जिल्हा नियोजन समिती बैठक : निधी वेळेत खर्च करण्याच्या केल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा नियोजन समितीमार्फत करावयाच्या विविध विकासकामांच्या निधी मागणीचे प्रस्ताव अंमलबजावणी यंत्रणांनी तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केल्या. गुणवत्तापूर्ण कामांसह निधी वेळेत खर्च करण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. १४) आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खा. प्रफुल्ल पटेल, नामदेव किरसान, डॉ. प्रशांत पडोळे, जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, आ. डॉ. परिणय फुके, अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, सहसराम कोरोटे, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी प्रजित नायर जिप  मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, विशेष निमंत्रित सदस्य राजेंद्र जैन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील धोंगडे, निमंत्रित सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सिटी सव्र्व्हेचा मुद्दाही या बैठकीत चर्चेला आला. हा प्रकल्प पुढील पाच ते सहा महिन्यांत मार्गी लागेल, असे बैठकीत सांगण्यात आले. सिटी सर्व्हेसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच लाख लागवडीसाठी जिल्हाभर नियोजन करावे, असे बैठकीत सांगण्यात आले. 

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्र बाह्य योजना सन २०२३-२४ मध्ये यंत्रणांनी निन्दी योजनांचा शंभर टक्के खर्च केला आहे. या खर्चाला बैठकीत मंजुरी देण्यात आली.

गोंदिया शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पासाठी निधी मिळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. जन सुविधा व नागरी सुविधा अंतर्गत कामे, जिल्हा क्रीडा संकुलातील कामे, खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ, काशिनाला व कुआढास नाला प्रकरण, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे रेडिऑलॉजिस्ट डॉक्टरची नियुक्ती करणे, गोंदिया रेल्वे स्टेशन सराफा लाईनजवळ पोलिस चौकीची मागणी आदी विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली. ओबीसी वसतिगृहाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जागा उपलब्ध झाली असून निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या

सर्व पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर आणाजलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या सर्व योजना सोलरवर आणाव्यात, असे निर्देश पालकमंत्री यांनी या वेळी दिले. सोबतच अर्धवट योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतही त्यांनी संबंधित विभागाला सूचना केल्या.

त्या मृतक बालकांच्या कुटुंबीयांना १० लाखांच्या मदतीचा ठरावगोंदिया तालुक्यातील दासगाव बु. येथील जिल्हा परिषद हिंदी पूर्वमा- ध्यमिक शाळेच्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या दोन्ही मृतक विद्यार्थ्यांना नियोजन समितीच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला.

आदिवासी उपाययोजनांचा शंभर टक्के निधी खर्चीजिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्र बाह्य योजना सन २०२३-२४ मध्ये यंत्रणांनी तिन्ही योजनांचा शंभर टक्के खर्च केला आहे. या खर्चाला बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया