शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

पालिकेला सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची अ‍ॅलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 21:52 IST

आझाद हिंद सेनेचे सेनापती व महान देशभक्त सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतींना सदैव उजाळा मिळावा. यासाठी शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील नगर परिषदेच्या उद्यानाला सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आले. मात्र नगर परिषदेने या उद्यानाला ‘सुभाष उद्यान’ असे नाव देत त्या नावाचे फलक प्रवेशव्दारावर नुकतेच लावले आहे.

ठळक मुद्देसुभाषचंद्र बोस उद्यानाला केले सुभाष उद्यान : फ्लॅक्स लावून विभाग मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आझाद हिंद सेनेचे सेनापती व महान देशभक्त सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतींना सदैव उजाळा मिळावा. यासाठी शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील नगर परिषदेच्या उद्यानाला सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आले. मात्र नगर परिषदेने या उद्यानाला ‘सुभाष उद्यान’ असे नाव देत त्या नावाचे फलक प्रवेशव्दारावर नुकतेच लावले आहे. त्यामुळे नगर परिषदेला सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची अ‍ॅलर्जी आहे का? असा संप्तत सवाल उपस्थित केला जात आहे.या गंभीर प्रकारासंदर्भात नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता येथील उद्यानाचे नाव बदलण्याचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच या संबंधीचा कुठलाही प्रस्ताव सुध्दा मंजुर करण्यात आला नसल्याचे सांगितले. मात्र यानंतर देखील या उद्यानाचे सुभाष उद्यान असे नाव देण्यात आले. तसेच त्या नावाचा फ्लॅक्स सुध्दा प्रवेशव्दारावर लावण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे हा ऐवढा गंभीर प्रकार असून नगर परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाºयांच्या लक्षात न आल्याचे आश्चर्य आहे. सुभाषचंद्र बोस यांचे नाव बदलून सुभाष उद्यान हे नाव देण्याची कल्पना नगर परिषदेच्या कोणत्या अधिकाºयाच्या सुपीक डोक्यातील आहे. यावरुन सुध्दा आता खळबळ उडाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाºया महान देशभक्ताच्या कार्याला सदैव उजाळा मिळत राहावा. त्यांच्या नावापासून भावी पिढीला प्रेरणा मिळावी, त्यांच्या कार्याची महती कळावी, यासाठी या उद्यानाला सुभाषचंद्र बोस उद्यान हे नाव देण्यात आले. मात्र नगर परिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे महान देशभक्ताची एकप्रकारे अहवेलना केली जात आहे.विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून सुभाषचंद्र बोस उद्यानाचे जुने प्रवेशव्दार पाडून नवीन प्रवेशव्दार उभारण्याची मागणी आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करुन अनेकदा पाठविण्यात आला. २७ जुलै २०१७ व ४ नोहेंबर २०१७ रोजी पाठविलेल्या प्रस्तावात या उद्यानाचे प्रवेशव्दार तुटफूट झाले आहे. तसेच केवळ वेल्डींग करुन तात्पुरते काम चालविणे शक्य नाही. त्यामुळे नवीन गेट तयार करण्याची गरज असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र नगर परिषदेकडे या महान देशभक्ताच्या नाव असलेल्या या उद्यानातील प्रवेशव्दार तयार करण्यासाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ तात्पुरती उपाययोजना म्हणून प्रवेशव्दारावर फ्लॅक्स लावून काम भागविण्यात आले आहे. त्याच फ्लॅक्सवर सुभाषचंद्र बोस उद्यानाचे नाव बदलून सुभाष उद्यान असे करण्यात आले आहे.सुरक्षा भिंत पडलीसुभाषचंद्र बोस उद्यान परिसरातील उपहारगृह ते शिवमंदिर व प्रताप क्लबपर्यंत उद्यानाची सुरक्षा भिंत तुटली आहे. त्यामुळे या परिसरातून रात्रीच्या वेळेस काही असामाजिक प्रवृत्तीच्या लोकांचा वावर असतो. तसेच याच भागातून मोकाट जनावरे आणि कुत्रे सुध्दा प्रवेश करतात. यासर्व प्रकाराची नगर परिषद बांधकाम विभागाला वांरवार माहिती देण्यात आली. त्यानंतर विभागीय अभियंत्याने सुरक्षा भिंतीचे बांधकाम करण्यासाठी मोजमाप सुध्दा केले. मात्र अद्यापही बांधकामाला सुरूवात केली नाही.सुभाषचंद्र बोस उद्यानाच्या नावात कुठलाही बदल केलेला नाही. प्रवेशव्दारावर लावलेल्या फ्लॅक्सवर चुकीने सुभाष उद्यान असे लिहिण्यात आले आहे. ती चूक त्वरीत दुरूस्त करण्यात येईल.- चंदन पाटीलमुख्याधिकारी नगर परिषद गोंदिया