लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : भारत हा कृषीप्रधान देश म्हणून जगात ओळखला जातो. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असल्याचे म्हटले जाते. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व दुग्ध व्यवसाय केला जातो. परंतु आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन घटत आहे. याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय डबघाईस आला आहे१०-१५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई व म्हशी असायच्या. पशुपालन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागायचा. शेतकऱ्यांची स्वत:ची गरज भागून सुद्धा दूध, दही, ताक व लोणी भरपूर प्रमाणात मिळत होते. परंतु मागील काही वर्षात पशुधनात प्रचंड घट झालेली दिसून येत आहे. आता खेड्यांमध्येही पॅकेटचे दुध मिळू लागले आहे.ग्रामीण भागामध्ये जनावरे चराई करिता जागा राखीव असायची व गुराखी असायचा. परंतु आज जनावरे चराई करिता गुराखी मिळत नाही. तर चराईच्या जागेवर अतिक्र मण झाले आहे. वैरनाला महागाईची झळ बसली आहे असून दुधाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही. देशी जनावरांकडून जास्त दूध उपलब्ध होत नाही, तर संकरित जनावरे शेतकरी विकत घेऊ शकत नाहीत.दुग्ध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या योजना असल्या तरी या योजनांचा मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ मिळतोय. शासनाने शेतकºयांना प्रोत्साहित करण्यासाठी नवीन योजना कार्यान्वित करावी. जेणेकरून ग्रामीण भागातील पशुपालक जनावरे पाळून दुग्धव्यवसाय करू लागतील.यंत्रांचे आगमन आले अंगलटपूर्वी उच्च जातीच्या देशी गाई शेतकरी पाळत होते व त्यापासून शेतकऱ्यांना कष्टाळू बैल मिळायचे. परंतु शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा शिरकाव झाल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांनी गोधन पाळणे बंद केले आहे. पूर्वी १०-२० एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांकडे २-३ बैलजोडी असायच्या. आज या बैलजोड्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे.
घटत्या जनावरांमुळे दुग्ध व्यवसायावर अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST
१०-१५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई व म्हशी असायच्या. पशुपालन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागायचा. शेतकऱ्यांची स्वत:ची गरज भागून सुद्धा दूध, दही, ताक व लोणी भरपूर प्रमाणात मिळत होते. परंतु मागील काही वर्षात पशुधनात प्रचंड घट झालेली दिसून येत आहे. आता खेड्यांमध्येही पॅकेटचे दुध मिळू लागले आहे.
घटत्या जनावरांमुळे दुग्ध व्यवसायावर अवकळा
ठळक मुद्देग्रामीण भागात पशुधन झाले कमी : दुग्ध व्यवसाय डबघाईस