शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी घेतात टॅबवर शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 21:17 IST

नवनवीन तंत्रज्ञानाची दररोज भर पडत असून जीवनच काय शिक्षणही डिजीटल होत चालले आहे. यातूनच विद्यार्थीही आता फळ््यावरील शिक्षणासह टॅबवर शिक्षण घेऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, शहरात हे सुरू असताना जंगलात वसलेल्या नक्षलग्रस्त संवेदनशील येडमागोंदी गावातील शाळेतही हे चित्र बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देशिक्षकांना व्हावे लागले विद्यार्थी : येडमागोंदी शाळा ठरत आहे आदर्श

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवनवीन तंत्रज्ञानाची दररोज भर पडत असून जीवनच काय शिक्षणही डिजीटल होत चालले आहे. यातूनच विद्यार्थीही आता फळ््यावरील शिक्षणासह टॅबवर शिक्षण घेऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, शहरात हे सुरू असताना जंगलात वसलेल्या नक्षलग्रस्त संवेदनशील येडमागोंदी गावातील शाळेतही हे चित्र बघावयास मिळत आहे. येथील शाळेतील ३१ विद्यार्थी टॅबवर शिक्षण घेत आहेत.महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सिमेला लागून गडचिरोली जिल्ह्यापासून २ किमी अंतरावरील व गोंदियापासून १२० किमी अंतावरी डोंगराच्या कुशीत येडमागोंदी हे गाव वसलेले आहे. ४०० लोकसंख्या असलेले छोटेशे गाव गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात मिसपिरी केंद्रात आहे. हे संपूर्ण गाव आदिवासींचे आहे. डोंगरानी वेढलेले, घनदाट जंगल, अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त, गावात जायला पक्के रस्ते नाहीत. गावातील बोलीभाषा छत्तीसगडी व गोंडी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही या गावातील शाळेला फुलविण्याचे काम रमेश बोरकर व सदाशिव पाटील या कर्तृत्ववान शिक्षकांनी केले.कल्पनेला भरारीचे पंख देत त्यांनी विद्यार्थ्यांना उंच भरारी घेण्यासाठी तयार केले. यासाठी शिक्षकांना आधी विद्यार्थी व्हावी लागले. मूळात मराठी असलेल्या या शिक्षकांना आधी छत्तीसगडी भाषा शिकावी लागली व त्यांनी ती भाषा शिकून नंतर त्या विद्यार्थ्यांना मराठी शिकविली. ही सर्व किमया डाएटचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांच्या नेतृत्वात डॉ. किरण धांडे, सूचित्रा जाधव, संदीप सोमवंशी, दिलीप नवखरे, सुनील हरिणखेडे यांच्या मदतीने केली. या लोकांनी या शाळेचा अध्ययन स्तर वाढविण्यासाठी येडमागोंदी शाळेला अनेक भेटी दिल्यात.दोन शिक्षक असलेल्या येडमागोंदी शाळेत ३१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.विविध उपक्रम घेऊन सदाशिव पाटील नावाच्या शिक्षकाने रमेश बोरकर यांच्या मदतीने येथील विद्यार्थ्यांना मराठी व गणित विषयात प्रगत केले. ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्ययन-अध्यापन केले जाते. विद्यार्थी स्वत: कविता व गोष्टी तयार करतात. या विद्यार्थ्यांची बोलीभाषा छत्तीसगडी व गोंडी असली तरी शाळेतील विद्यार्थी शिक्षकांच्या प्रभावामुळे मराठी भाषा बोलतात.परिणामी ही शाळा १०० टक्के प्रगत म्हणून नावारुपास आली.‘जे राव न करे-ते गाव करे’ चा प्रत्यय येडमागोंदी या गावात आला. येथे पालक व शिक्षकांत उत्तम समन्वय आहे.गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन शाळा डिजीटल व टॅबयुक्त करण्यासाठी आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा ७० हजार रुपयांची शाळेला मदत केली. गावकरी व शिक्षकांनी मिळून डिजीटल, टॅबयुक्त व गुणवत्ता पूर्ण शाळा तयार केली. या शाळेतील विद्यार्थी टॅबचा वापर करतात.

टॅग्स :educationशैक्षणिक