शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आमगाव खुर्दचे विद्यार्थीही उपोषणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:47 IST

आमगाव खुर्द ग्राम पंंचायतला सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ट करावे, म्हणून आमगावखुर्दचे नागरिक मागील २७ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणावर बसले आहेत.

ठळक मुद्देसाखळी उपोषणाचा १६ वा दिवस : नगर पंचायतमध्ये समाविष्ट करण्याची मागणी

ऑनलाईन लोकमतसालेकसा : आमगाव खुर्द ग्राम पंंचायतला सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ट करावे, म्हणून आमगावखुर्दचे नागरिक मागील २७ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणावर बसले आहेत. आज १६ व्या दिवशी आमगाव खुर्दचे विद्यार्थी सुध्दा साखळी उपोषणावर बसून गावकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचा संकल्प दाखविला. किशोरवयीन विद्यार्थ्याच्या सहभागामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळत आहे. तर दुसरीकडे १६ दिवस लोटून सुध्दा शासन प्रशासनाच्या वतीने कोणतेही प्रतिसाद मिळत नाही.आमगाव खुर्द ग्राम पंचायतच्या संपूर्ण भाग तालुका मुख्यालयाच्या परिसरात आहे. परंतु सालेकसा तालुक्याच्या नावाने चालणारी सर्व कार्यालये आणि बाजारपेठ आमगाव खुर्दच्या हद्दीत आहेत. आमगाव खुर्दला नगर पंचायत मध्ये समावेश करण्याची मागणी रास्त आहे. परंतु शहराच्या बाहेर असलेली सालेकसा ग्राम पंचायत आता नगर पंचायत झाली आहे. ही विषम परिस्थिती पाहून आमगाव खुर्दचे नागरिक व्यथीत झाले आहेत. वारंवार शासनाच्या निदर्शनात आणून आपली मागणी शासन दरबारी करीत आहेत. परंतु शासन याकडे सतत कानाडोळा करीत आहे. आमदार व स्थानिक प्रशासन सुध्दा नागरिकांसोबत असहकार्याची भूमिका पार पाडत असल्याचा आरोप गावातील सर्व पक्षीय लोक करीत आहेत. त्यांच्या आरोपाला सुध्दा सकारात्मक उत्तर मिळत नाही. दरम्यान काही लोक या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रत्न करीत असल्याच्या चर्चा होत आहेत. कुणी चौकात, कुणी बसस्थानकावर तर कुणी पानटपरीवर अशा ठिक-ठिकाणी नगर पंचायतीच्या चर्चेत गुंतलेले आहेत.दरम्यान व्हाटॅ्सअ‍ॅपवर एकमेकांवर शब्दबाण चालविण्याचा क्रम सुध्दा सुरु आहे. परंतु या सगळ्या गोष्टींमुळे खचित न होता आमगाव खुर्दवासी उपोषण करीत आहेत. या राजकीय, गैरराजकीय, दुकानदार, महिला, पुरुष, विद्यार्थी, व्यापारी, ठेकेदार सर्वच वर्ग या आंदोलनात उतले आहेत. या आंदोलनाला आज (दि.१४) ला १६ दिवस सुरू झाला आहे. या आंदोलनात किशोरवयीन विद्यार्थ्यानी उपोषणात भाग घेतला आहे. यामध्ये मंगेश चुटे, सौरभ सोनवाने, दीपक बहेकार, अटलसिंह भाटीया, आदित्य दोनोडे, शुभम शहारे, शैलेश शेंडे, जितेंद्र दमाहे, गोल्डी भाटीया, स्वप्नील बोम्बार्डे, नवीन श्रीवास्तव, स्वप्नील करवाडे, नवीन श्रीवास्तव, रुपेश मसराम आदींचा समावेश आहे.न्यायालयाची सरकारला नोटीसआमगाव खुर्दला सालेकसा नगर पंचायतमध्ये समावेश करण्यासंदर्भात अंमलबजावणीचे आदेश देऊन न्यायालयाने याचीका निकाली काढली होती. परंतु न्यायालयाच्या आदेशावर निवडणूक तात्पुरती थांबविण्यात आली होती. दोन वर्ष लोटून ही कोणतेच पाऊल शासनाने उचलले नाही. उलट सालेकसा नगर पंचायतची निवडणूक घेऊन सत्ता स्थापन केली. ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनात आली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवाना ७ मार्च रोजी अवमानना नोटीस बजावत दोन आठवड्यात स्पष्टीकरण मागीतले. २०१५ मध्ये ब्रजभूषण बैस व वासुदेव चुटे नगर पंचायतमध्ये समाविष्ट करण्यासाठी जनहित याचीका दाखल केली होती. तेव्हा सरकारने न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम केले.

टॅग्स :Studentविद्यार्थी