शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:19 IST

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतात पुरेशा प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. मात्र काही भागात अजूनही बºयापैकी पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशेतीच्या कामाला वेग : अनेक ठिकाणी रोवणीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतात पुरेशा प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. मात्र काही भागात अजूनही बऱ्यापैकी पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे.यंदा मृग नक्षत्राची सुरुवात चांगल्या पावसाने झाली होती. परंतु त्यानंतर पूर्ण मृग नक्षत्र कोरडा गेला. एवढेच नव्हे तर भरपूर पाऊस पडणारा आद्रा नक्षत्र सुद्धा कोरडा गेला. दरम्यान शेतकऱ्यांनी घाई न करता सावध पवित्रा घेतला व पेरणी रोखून थांबविली. मात्र काही शेतकऱ्यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच पेरणी केली. त्यानंतर सतत १५ दिवस पाऊस पडला नाही आणि पºहे अर्धे उगवलेच नाही. ज्यांनी जून महिन्याच्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्यात पेरणी केली आता त्यांचे पºहे उगवले. परंतु पाणी असून सुद्धा नर्सरी आखूड असल्याने रोवणी योग्य झाल्या नाहीत. त्यामुळे आणखी एक आठवडा रोवणीला सुरुवात करायला उशीर होऊ शकतो.या दरम्यान ज्यांची नर्सरी वाढीत आली, त्यांनी रोवणी सुरु केली आहे. सतत पाऊस पडत राहिला तर सर्वांच्या रोवण्या जुलैअखेर किंवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपणार, असे चित्र आहे. सोमवार आणि मंगळवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतीच्या कामाला जोमाने सुरूवात झाल्याचे चित्र तालुक्यात आहे.काही भागात अजूनही दमदार पावसाची वाटतालुक्यातील झालीया, कावराबांध, बिंझली परिसरात तसेच सोनपुरी, बाम्हणी परिसरात अजून दमदार पावसाची वाट शेतकरी बघत आहे. या भागात कोरडवाहू रेताळ किंवा खडकाळ जमीन असल्याने शेतात पाणी जास्त काळ थांबून राहत नाही. या भागात सतत आठ दिवस पर्जन्यमान झाल्याशिवाय जल संग्रहण होत नाही. अजूनही या भागात रोवणीला खरी सुरुवात झाली नाही. शेतकरी दमदार पावसाची वाट आहे. यातच सालेकसा, पिपरीया, दरेकसा, बिजेपार आदी परिसरात पुरेसा पाऊस पडत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस