शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

‘सारस फेस्टिव्हल’ १५ डिसेंबरपासून

By admin | Updated: December 7, 2015 05:55 IST

सारस हा दुर्मिळ आणि मोठा पक्षी राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळतो. या सारस पक्ष्यांचे संवर्धन करुन

गोंदिया : सारस हा दुर्मिळ आणि मोठा पक्षी राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळतो. या सारस पक्ष्यांचे संवर्धन करुन त्यांची वृद्धी व्हावी तसेच त्यांना पाहण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून यावर्षी १५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘सारस फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षीमित्र, वन्यजीव छायाचित्रकार व पर्यटक सारस बघायला जिल्ह्यात येणार आहे. जिल्ह्याची ओळख तलावांचा जिल्हा म्हणून आहे. त्यात निसर्ग संपन्न असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पर्यटक नवेगाव-नागझिरा राष्ट्रीय व्याघ्र राखीव क्षेत्राला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येत येतात. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांचा वापर पूर्वी सिंचनासाठी व्हायचा. आता मात्र हे तलाव पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. ते स्थलांतरीत व विदेशी पक्षांच्या काही काळाच्या अधिवासामुळे. जिल्ह्याला वरदान म्हणून लाभलेल्या या दुर्मिळ सारसाचे संवर्धन व्हावे यासाठी आता प्रशासनही पुढाकार घेत असून ‘सारस फेस्टिव्हल’ ही संकल्पना पुढे आली. यातूनच जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत ‘सारस फेस्टिव्हल’च्या आयोजनाबाबत शनिवारी (दि.५) वन्यजीव प्रेमी, अधिकारी, हॉटेल व्यवस्थापन, ट्रॅव्हल एजन्सी, बिरसी विमानतळ व्यवस्थापन, वन्यजीव फोटोग्राफर यांच्यासोबत बैठक पार पडली. यात १५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘सारस फेस्टिव्हल’चे आयोजन करण्याबाबत ठरविण्यात आले. विशेष म्हणजे, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंबई येथील पत्रकारांचा मुक्काम असलेल्या सुयोग या निवासस्थानाला पालकमंत्री राजकुमार बडोले हे भेट देणार असून या पत्रकारांना येथील ‘सारस फेस्टिव्हल’ व सारस पक्षी बघायला येण्याचे निमंत्रण देणार आहेत. सारस पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असलेल्या परसवाडा, झिलमिली व घाट्टेमनी येथील ग्रामस्थांना या फेस्टिव्हलमध्ये सहभागी करु न घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना सारस संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. ‘सारस फेस्टिव्हल’च्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचा पुढाकार महत्वाचा ठरणार आहे. या बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, वन्यजीवप्रेमी डॉ. राजेंद्र जैन, मुकुंद धुर्वे, भारत जसानी, सुनील धोटे, अनिल भागचंदानी, रुपेश निंबार्ते, त्र्यंबक जारोदे, डॉ.विजय ताते, सुबोध सिंग, बिरसी विमानतळ व्यवस्थापनाचे प्रजापती, राजेंद्र वामन, धर्मेश पटेल, अंकीत पटेल, महेश गुप्ता उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)सारस चित्रकला व सायकल मॅराथॉन स्पर्धा४याच महोत्सवाचे औचित्य साधून हौसी व वन्यजीव छायाचित्रकारांसाठी नवेगाव-नागझिरा ‘फोटोशूट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत देशातील नामवंत छायाचित्रकारसुद्धा फेस्टिव्हलदरम्यान सारस बचावासाठी प्रयत्न करणारे शेतकरी ‘सारस मित्र’ पुरस्काराने सन्मानित केले जातील. तसेच गोंदियातील अनेक शाळांमध्ये सारस चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरील इमारतीच्या भिंती, उड्डाण पुलाच्या भिंती तसेच बिरसी विमानतळापासून परसवाडाकडे जाणाऱ्या विमानतळाच्या सुरक्षा भिंतीवर सारस चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. बिरसी विमानतळ ते परसवाडादरम्यान सायकल मॅराथॉन स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. रेल्वे स्टेशन, बसस्थानक व शहरातील मुख्य ठिकाणी सारस फेस्टिव्हलच्या आयोजनाबाबतचे बॅनर लावण्यात येईल. असा आहे सारस४महाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्यातच सारस हा पक्षी आढळून येतो. सारस सर्वात मोठा उडणारा पक्षी आहे. नर आणि मादी ही सारसची जोडी आपल्या जोडीदाराची एकदा निवड केल्यानंतर ते आयुष्यभर सोबत राहतात. जोडीदारांपैकी एकाचा जरी मृत्यू झाला तर त्याच्या विरहाने दुसरा अन्नत्याग करु न आपले जीवन संपवितो. जसे इतर पक्षी जंगलात व झाडांवर राहतात त्याला मात्र सारस अपवाद आहे. सारस पक्षी मात्र माणसांच्या वस्तीजवळच्या तलावांजवळ व धानाच्या शेतात वास्तव्य करतो. तो शेतक ऱ्यांचा व आपलाही एकप्रकारे मित्रच आहे. सारस कधीच झाडावर बसत नाही. तो घरटेसुद्धा धानाच्या शेतात तयार करतो. याच घरट्यात तो अंडी घालून पिलांना जन्म देतो. अशा या दुर्मिळ सारस पक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी आपली सर्वांची आहे.