शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भू-माफिया व गुंडांच्या अत्याचाराला रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 05:00 IST

नगर परिषद व लगतच्या ग्रामीण परिसरात काही वर्षांपासून ज़मीन व प्लाॅटच्या धंद्यात लिप्त काही लोकं चुकीच्या पद्धतीने प्लॉटवर कब्जा करणे तसेच एकच प्लॉट अनेक लोकांना विकून सामान्य जनतेची फसवणूक करीत आहेत. असे प्रकार कित्येकदा उद्भवले असून अनेक पोलीस केसेस सुद्धा झाल्या आहेत. परंतु सर्वसामान्य जनतेशी निगडित अशा प्रकरणात शासकीय यंत्रणा पाहिजे तशी लक्ष देऊन कार्यवाही करीत नाही, किंवा अपराधिक गतिविधीत लिप्त भू-माफियांना आश्रय प्राप्त होताना दिसतो.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  शहरात भू-माफिया व गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून सामान्य नागरिकांची मुस्कटदाबी केली जात आहे. या अत्याचाराला रोखण्यात यावे  अशी मागणी येथील विविध सामाजिक संघटनांनी केली असून जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. निवेदनात, नगर परिषद व लगतच्या ग्रामीण परिसरात काही वर्षांपासून ज़मीन व प्लाॅटच्या धंद्यात लिप्त काही लोकं चुकीच्या पद्धतीने प्लॉटवर कब्जा करणे तसेच एकच प्लॉट अनेक लोकांना विकून सामान्य जनतेची फसवणूक करीत आहेत. असे प्रकार कित्येकदा उद्भवले असून अनेक पोलीस केसेस सुद्धा झाल्या आहेत. परंतु सर्वसामान्य जनतेशी निगडित अशा प्रकरणात शासकीय यंत्रणा पाहिजे तशी लक्ष देऊन कार्यवाही करीत नाही, किंवा अपराधिक गतिविधीत लिप्त भू-माफियांना आश्रय प्राप्त होताना दिसतो. अशाच जमीन खरेदी विक्री व्यवसायात जीव घेण्यासाठी लोक मागेपुढे बघत नाही. २८ जानेवारी रोजी धनेंद्र भुरले या सामाजिक कार्यकर्त्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गोळीबार करुन त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केला व या प्रकरणातून याची प्रचिती येते. अशा व या सारख्या प्रकरणात विशेष लक्ष देऊन आरोपींवर कार्यवाही करण्यात यावी, जेणेकरून जनता भयमुक्त जीवन जगू शकेल असे नमूद आहे. निवेदन देताना विविध सामाजिक संघटनांकडून डी.एस. मेश्राम, कैलास भेलावे, रमेश ब्राम्हणकर, सुनील भोंगाडे, लीलाधर पाथोडे, रमेश नामपल्लीवार, विठ्ठल भरणे, अतुल सतदेवे, मालती किन्नाके, हेमलता आहाके यांच्यासह अन्य उपस्थित होते. 

अन्यथा तीव्र आंदोलन करणार - शहरात वाढत असलेले गोळीबार प्रकरण गंभीर होत चालले आहे. गुंड लोक अवैधरित्या शस्त्र बाळगतात. अशात त्यांच्यावर मोका अंतर्गत सक्त कार्यवाही करण्यात यावी. भुरले गोळीबार प्रकरण व अशा अन्य गंभीर प्रकरणात लिप्त गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांची योग्य चौकशी करून सामान्य जनतेला न्याय देण्याची मागणीही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भुरले गोळीबार प्रकरण व यासारख्या प्रकरणात प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारची दिरंगाई केल्यास किंवा तपासात कमतरता आढळून आल्यास सर्वसामान्य जनतेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारासुद्धा सामाजिक संघटनांकडून देण्यात आला आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस