शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
5
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
6
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
7
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
8
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
9
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
11
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
12
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
13
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
15
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
16
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
17
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
18
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
19
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
20
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्च! महादेवाचा नंदी पितोय चक्क पाणी?; मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 17:42 IST

मंदिरातला व्हिडीओ होतोय व्हायरल  

गोंदिया : सध्या श्रावण महिना सुरू असून सोमवारी मंदिरात नेहमीच्या तुलनेत भाविकांची लांब रांग असल्याचे पाहायला मिळते. मात्र, आमगाव तालुक्यातील एका मंदिरात गावकऱ्यांनी वेगळ्याच कारणासाठी गर्दी केलीये. गावकऱ्यांची अपार श्रद्धा असल्येल्या या मंदिरात दगडाचा नंदी चक्क पाणी पित असल्याची वार्ता वाऱ्याच्या वेगाने पसरली अन् दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली. 

कवडी गावातील साखरीटोलापासून २ किमीवर असलेल्या पिंपळाच्या वृक्षाखाली असलेल्या महादेवाच्या मंदिरात हा प्रकार घडलाय. या मंदिरात भगवान शंकराची दगडापासून बनवलेली पिंड व सोबत दगडाचे दोन नंदी असून बाजूलाच दुर्गादेवीची मुर्ती आहे. यातील दोनपैकी एक नंदी चक्क पाणी पित असल्याची बातमी हा हा म्हणता परिसरात पसरली.अन् हा दैवी चमत्कार असल्याची भावना मनात ठेवत भाविकांनी मंदिराकडे धाव घेतली.

जो-तो तांब्यात पाणी व लहान चमचा घेऊन मंदिराकडे धाव घेऊ लागला. काहींनी चमच्याने नंदीला पाणी पाजून पाहिले व हा चमत्कार पाहायला मंदिरात चांगलीच गर्दी उसळली. या घटनेने गणपती दूध पितो, गणपतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याच्या जुन्या घटनांची आठवण ताजी झाली. आता हा खरचं चमत्कार आहे की काय हे सांगायला काही स्पष्ट प्रमाण नाही. कारण याआधीही अशा प्रकारच्या अनेक घटना व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे, यामागचे शास्त्रीय कारण काय याचा शोध घेतल्यानंतर नेमका प्रकार निदर्शनास येईल. मात्र, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलTempleमंदिरgondiya-acगोंदिया