शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांच्या चोरीचा २४ तासांत छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:42 IST

रायपूर ते इंटरसिटी एक्सप्रेस या गाडीने प्रवास करणाºया एका महिला प्रवाशाचे ४ लाख ७१ हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले. ही घटना रविवारी (दि.४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती.

ठळक मुद्देरेल्वे पोलिसांची कामगिरी : रेल्वे प्रवासात महिलेचे ४.७१ लाखांचे साहित्य लंपास

ऑनलाईन लोकमतगोंदिया : रायपूर ते इंटरसिटी एक्सप्रेस या गाडीने प्रवास करणाºया एका महिला प्रवाशाचे ४ लाख ७१ हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले. ही घटना रविवारी (दि.४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. गोंदिया रेल्वे पोलिसांनी २४ तासांत हलवून या घटनेचा छडा लावला.रायपूरच्या आम बगिच्या जवळील सुंदरनगर येथील रहिवासी ३० वर्षीय महिला इंटरसिटी एक्स्प्रेसने रायपूरवरून नागपूरला जात होती. आरोपी प्रदीप कुमार हा सुद्धा याच गाडीने सदर महिलेसह प्रवास करीत गोंदियाला आला. मेगा ब्लॉकमुळे सदर गाडीचा थांबा गोंदियापर्यंतच होता. त्यामुळे सदर महिला आपल्या पुढील प्रवासासाठी गोंदियात रेल्वेस्थानकावर उतरली. दरम्यान आरोपीने महिलेसह ओळख केली व नागपूरला जाण्यासाठी तोसुद्धा उतरला. ४ फेब्रुवारीला गाडी क्रमांक (१८२३९) शिवनाथ एक्सप्रेस पहाटे ३ वाजता प्लॅटफॉर्म-३ वर पोहचली.सदर महिला गाडीत चढत असताना आरोपीने तिला विश्वासात घेवून तिची बॅग लंपास केली. त्या बॅगमध्ये दोन जोडी सोन्याच्या बांगड्या (किंमत १५ हजार रूपये), एक ब्रासलेट (३० हजार रूपये), ११ ग्राम वजनाच्या दोन सोन्याची चैन व ५ ग्रॅमचा लॉकेट (५५ हजार रूपये), सहा ग्रॅमच्या तीन सोन्याच्या अंगठ्या (२४ हजार रूपये), तीन जोडी चांदीच्या चाळ (१ लाख ५० हजार रूपये), सहा जोडी पातय चेन (६ हजार रूपये), नगदी २० हजार रूपये, चार मोबाईल, एसबीआय एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, पोस्ट आॅफिसच्या एफडीचे कागदपत्रे अशा एकूण चार लाख ७१ हजार रूपयांच्या ऐवजाचा समावेश होता. या घटनेची तक्रार सदर महिलेने गोंदिया रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला होता. घटनेचा तपास सुरू केला.सोशल मीडियाची घेतली मदतचौकशीदरम्यान महिलेने केलेल्या आरोपीच्या वर्णनानुसार गोंदियाचे रेल्वे सुरक्षा दल, शासकीय रेल्वे पोलीस व टास्क टीमद्वारे सीसीटीव्ही फुटेजचे अवलोकन करण्यात आले. त्यानंतर आरोपीची ओळख पटविण्यात आली. तसेच सदर फुटेज आरोपीला अटक करण्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमाने पुढील स्थानकांना पाठविण्यात आले.मोबाईलवरुन केले ट्रेससदर महिलेल्या चोरी गेलेल्या मोबाईल क्रमांकांची तपासणी करून ट्रेसिंग करण्यात आले. त्या आधारावर आरोपी नंदूरबार येथे असल्याचे समजले. याची त्वरित माहिती व आरोपीचे फुटेज शासकीय रेल्वे पोलीस नंदूरबार यांना देण्यात आली. नंदूरबार पोलिसांनी फुटेजच्या आधारावर आरोपीला अटक करुन गोंदिया पोलिसांना सूचना दिली. यावर आरोपीला अटक व चौकशी कारवाईसाठी टास्क टीम रेल्वे सुरक्षा दल गोंदिया व शासकीय रेल्वे पोलीस गोंदिया यांची संयुक्त चमू नंदूरबारसाठी रवाना झाली. या प्रकरणाचा तपास गोंदिया रेल्वेचे सहायक पोलीस निरीक्षक नालट करीत आहेत. केवळ २४ तासांत सदर चोरी प्रकरणाचा छळा लावण्यात आला.

टॅग्स :Crimeगुन्हा