शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीच्या कामाला जोमाने सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 22:37 IST

मृग नक्षत्र लागताच लगेच दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात सुध्दा गारवा निर्माण झाला आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्याने प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात नागरंणी करीत असून धान पेरणीच्या कामाला लागला आहे.

ठळक मुद्देमृगधारा बरसल्याने शेतकरी आनंदी : धान खरेदी केंद्रावर गर्दी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मृग नक्षत्र लागताच लगेच दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात सुध्दा गारवा निर्माण झाला आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्याने प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात नागरंणी करीत असून धान पेरणीच्या कामाला लागला आहे. त्यामुळे सर्वत्र शेतावर पºहे टाकण्याची कामे जोमाने सुरु झाली आहेत.अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत तसेच खत टाकणे, पार, धुरे दुरुस्त करणे, शेतीची सफाई करणे इत्यादी कामे जवळपास संपविली होती. मृग लागला की पऱ्हे टाकायचे या तयारीत शेतकरी होते. परंतु शेतकऱ्यांना पऱ्हे टाकण्यासाठी जमिनीची नागरणी करणे आवश्यक असते.अशात प्रत्येक शेतकरी पावसाची वाट बघत होता. मृगाच्या सुरुवातीला एकदा तरी पावसाने हजेरी लावावी, अशी अपेक्षा करीत होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पावसाने मृग नक्षत्र लागताच हजेरी लावली. दमदार पाऊस झाल्याने सगळ्या शेतकऱ्यांची कामे सुरु झाली. प्रत्येक शेतकरी धान खरेदी करुन किंवा मागील वर्षीचे ठेवलेले बियाणे वापरुन पेरणी करीत आहेत.गोंदिया जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन सामान्यत: १२ जून पर्यंत होत असते. त्यानुसार १२ ते १६ जून दरम्यान एकदा पाऊस येण्याची दाट शक्यता असते. अशात मशागत करुन ठेवलेल्या शेतात ८ जूनपासून पेरणीला सुरुवात केली तर ते व्यवस्थित उगवतात, असा समज असून अनेकांचे प्रयोग यशस्वी होतात. परंतु यंदा लगेच पावसाने हजेरी लावल्याने आणि सगळ्यांना पेरणीची संधी लाभली.धान पेरणीची कामे साधारणत: जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केलेले उत्तम असते. परंतु पावसाच्या लहरीपणात कधीकधी पेरणी मागे पुढे होत असते.समाधानकारक पावसाची अपेक्षायंदा हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास केला तर मान्सून चांगला येणार असून पिकासाठी समाधानकारक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. आजचा शेतकरी काही प्रमाणात आपल्या पारंपरिकरित्या पावसाचा अंदाज लावतात. परंतु आता जास्तीत जास्त शेतकरी हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवू लागला आहे. अनेकवेळा हवामान खात्याचे भाकित सुद्धा फोल ठरते. त्यामुळे अनेक शेतकरी सावध पवित्रा घेत शेतीचे नियोजन तयार करतात.पाऊस कमी जास्त झाला तरी भरघोष पीक घेण्यासाठी नियोजनबद्ध शेतीची कामे करतात.कृषी केंद्रावर एकच गर्दीपेरणीची लगबग सुरु झाली असून अनेक शेतकरी दरवर्षी सुधारित वाणाचे बियाणे खरेदी करतात. काही शेतकरी संकरीत वाण टाकण्याला महत्व देतात. त्यासाठी कृषी केंद्रावर जाऊन नवीन वाणाच्या धानाची किंवा जास्त उत्पादन देणाºया वानाची खरेदी करु लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढत चालली आहे. अशात अनेक कृषी केंद्र चालक संधीचा उपयोग घेत गैरलाभ घेण्याचासुद्धा प्रयत्न करतात आणि बोगस बियाणेसुद्धा शेतकºयांच्या हातात थोपवितात. अशात प्रत्येक शेतकऱ्याने सावधतेने बियाणे खेरदी करुन पेरणी करावी. पेरणीची वेळ निघाल्यास उत्तम प्रतिची बियाणेसुद्धा कामाची राहत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी