शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

वाढती रुग्णसंख्या विचारात घेता ऑक्सिजन प्लांट त्वरित सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 5:00 AM

जिल्ह्यात मागील वर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन प्लांट शासनाने मंजूर केले होते. यासाठी ५० लाख रुपयांचा निधीसुध्दा मंजूर केला होता. मात्र अद्यापही हा प्लांट सुरू करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. सहा महिन्याचा कालावधी लोटूनही आणि संदर्भात वेळाेवेळी पाठपुरावा करूनसुद्धा हा प्लांट सुरू करण्यास दिरंगाई केली जात आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून आरोग्य विभागाने याची अद्यापही गांभीर्याने दखल घेतली नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात दररोज सहाशे कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. यात गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. शासकीय रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरची क्षमतादेखील आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत आहे. रुग्णसंख्येची वाढ कायम असल्याने जिल्ह्यात अजून बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मेडिकलमधील मंजूर ऑक्सिजन जनरेशन प्लांट त्वरित सुरू करून रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन प्लांट शासनाने मंजूर केले होते. यासाठी ५० लाख रुपयांचा निधीसुध्दा मंजूर केला होता. मात्र अद्यापही हा प्लांट सुरू करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. सहा महिन्याचा कालावधी लोटूनही आणि संदर्भात वेळाेवेळी पाठपुरावा करूनसुद्धा हा प्लांट सुरू करण्यास दिरंगाई केली जात आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून आरोग्य विभागाने याची अद्यापही गांभीर्याने दखल घेतली नाही. यामुळे जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण राहणार, असा सवाल देखील माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दररोज गंभीर होत चालली आहे. दररोज ६०० ते ७०० रुग्णांची भर पडत असल्याने आता रुग्णातील बेडदेखील अपुरे पडत आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र यानंतरही जिल्हा व आरोग्य प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. हा सर्व प्रकारच धक्कादायक असून यामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींवर माजी आ. अग्रवाल यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावर देशमुख यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याचे व ७ दिवसात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचे आश्वासन अग्रवाल यांना दिले.  

ऑक्सिजन प्लांट झाले असते तर५० ते ६० जणांचे प्राण वाचविणे झाले असते शक्यमागील वर्षी शासनाने मेडिकलमध्ये मंजूर केलेला ऑक्सिजन प्लांट वेळेत सुरू झाला असता तर जिल्ह्यातील ५० ते ६० रुग्णांचे जीव वाचविणे शक्य झाले असते. ऑक्सिजनसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळी आली नसती. तसेच शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला नसता. मात्र प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईचे परिणाम आता रुग्णांना भोगावे लागत असल्याचा आरोप माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी केला आहे. 

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची कल्पना असताना आणि ऑक्सिजन प्लांटसाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर असतानासुध्दा तो सुरू करण्याकडे यंत्रणेने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठाेर कारवाई करून रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऑक्सिजन प्लांट त्वरित सुरू करण्याची गरज आहे. - गोपालदास अग्रवाल, माजी आमदार

 

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालcorona virusकोरोना वायरस बातम्या