शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

स्वदेशी खेळात होतो नुसताच ‘खेळखंडोबा’

By admin | Updated: January 31, 2015 23:22 IST

सडक-अर्जुनी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या वर्ग १ ते ४ (प्राथमिक) आणि वर्ग ५ ते ७ (माध्यमिक) गटाच्या माध्यमातून स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय स्पर्धांचे

सडक अर्जुनी : सडक-अर्जुनी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या वर्ग १ ते ४ (प्राथमिक) आणि वर्ग ५ ते ७ (माध्यमिक) गटाच्या माध्यमातून स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन तालुक्यातील खडकी-बाम्हणी या गावी केले आहे. मात्र हे खेळ केवळ औपचारिकता म्हणून खेळले जात असल्यामुळे या खेळांच्या आयोजनामागील मूळ हेतूच बाजुला राहात आहे.स्वदेशी खेळाच्या माध्यमातून शारीरिक, सामाजिक व बौद्धिक विकास होते. याशिवाय यातून चांगले खेळाडू तयार व्हावेत, अशीही अपेक्षा आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात ७६ शाळा असून ३ हजार ६३१ मुले आणि ३ हजार ४६३ मुली त्यातून शिक्षण घेतात. वर्ग ५ ते ७ च्या माध्यमिक शाळा ४९ आहेत. त्यात २ हजार ९९० मुले तर २ हजार ९८० मुली आहेत. स्वदेशी खेळाच्या तालुका ते जिल्हास्तरिय सामने होणार असल्याची माहिती मिळताच हौसी शाळेतील शिक्षक फक्त स्पर्धा होण्याच्या एक महिना अगोदर मुलांना सराव करण्याची संधी देतात. वास्तविक जे खेळ खेळले जाणार आहेत त्या खेळांचा सराव वर्षभर चालला पाहिजे. शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शाळेच्या या मुलांना खेळण्यासाठी पटांगणाची जागा असणे आवश्यक आहे. शाळेला पटांगण आहे पण त्या शिक्षकाच्या माध्यमातून मुलांना शारीरिक शिक्षण दिले जात नसल्याची बाब पुढे आली आहे. म्हणजे परीक्षा एक महिन्यावर येवून ठेपली असता अभ्यास करायचा व परीक्षा कशीतरी पास करायची अशी परिस्थिती आहे. स्वदेशी खेळांचा सराव प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुलांना वर्षभर करण्यासाठी बाध्य केल्यास त्यातून चांगले खेळाडू तयार होऊ शकतात. या दृष्टीने शासनानेही योग्य ती पावले उचलणे गरजेचे झाले आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेत दररोजच्या शेवटच्या तासिकेला शारीरिक शिक्षणाचा वर्ग घेतला पाहिजे, पण तालुक्यात कोणत्याही शाळेत शारीरिक शिक्षणाचे वर्ग घेतल्या जात नसल्याचे दिसत आहे. शिक्षण विभागाने लक्ष देवून शारीरिक शिक्षणाचे वर्ग घेण्यास बाध्य केले पाहिजे. (शहर प्रतिनिधी)