लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार ‘कोरोना’वर प्रतिबंध घालण्यासाठी वेळोवेळी आदेश निर्गमित केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता व पुढील धोके टाळण्यासाठी आणि कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी गोंदियात ‘लॉकडाऊन’ म्हणजे कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मात्र यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.रविवारी सकाळी ७ वाजपासून तर २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजतापर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल. संपूर्ण खासगी, कॉपोर्रेट कंपन्या आणि आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. गोंदिया शहरासह आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, गोरेगाव, तिरोडा या तालुक्यांत शंभरटक्के बंद पाळण्यात आला होता.आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार गोंदिया जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. परंतु काय करावे काय करू नये या संदर्भात जिल्हा प्रशासन प्रसारमध्यामांच्या पुढे आले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संदर्भात एकही पत्रपरिषद घेतली नाही. कोरोना संदर्भात जागरूक नागरिकांनी काय करावे याच्या सूचनाही देण्यात आल्या नाहीत. पर्यटन बंदी, बाजार बंदी, लग्न सोहळा बंदी, कोचिंग क्लासेसबंदी, तंबाखुजन्य पदार्थ विक्रीवर बंद, चित्रपटगृहांवर बंदी हे निर्णय सुद्धा उशीरा घेण्यात आले.विदेशातून आलेल्या लोकांची तपासणी करण्यासाठी आधी शोधाशोध करण्यात आली. त्यानंतर पुढे सुरळीत सुरू झाले. काही लोक स्वयंप्रेरणेने पुढे येऊन तपासणी करीत आपण कर्तव्यदक्ष नागरिक असल्याची प्रचिती त्यांनी अशा संकटाच्या काळात दिलेली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी आवाहन केल्यानंतर रविवारी (दि.२२) जिल्हवासीयांनी आपल्या एकीची ताकत दाखवून देत क डकडीत बंद पाळला.गर्दी करू नकारविवार, २२ मार्च रोजी कर्फ्यू पाळला असला तरी त्यानंतर गर्दी करू नका. आज केलेल्या मेहनतीवर उद्या पाणी फेरले जाऊ नये यासाठी सर्वानी खबरदारी घ्या. सुज्ञ नागरिक म्हणून वागा, गावात सर्व लोक घरी असतील तरी त्यांनी घोळका करून गप्पा मारू नये. गर्दी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.आठवडी बाजार बंदलोकांची होणारी गर्दी विचारात घेता शहरातील आठवडी बाजार भरणार नाहीत. परंतु भाजी विक्रीचे किरकोळ बाजार सुरू राहतील. येथे गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.हात स्वच्छ धुवाशाळेतील मुलांना स्वच्छतेची सवय लागावी यासाठी हातधुण्याची महती शिक्षक पटवून देतात. तिच बाजू कारोना ने आपण सगळ्यांवर आणल्यामुळे प्रत्येकाने साबनाने किंवा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, शिंकतांना तोंडावर रूमाल घ्यावा, आपली बोटे नाक किंवा तोंडात टाकू नये, असे सुचविले.सावध रहाकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न सुरू आहे. आरोग्य विभाग, पोलीस व प्रशासकीय मशीनरी युद्धस्तरावर काम करीत आहे. नागरिकांनीही सरकारला सहकार्य करावे. नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. घरी राहूनच काम करावे, सावधगिरी बाळगावी.- डॉ. संगिता पाटीलसर्वत्र राहीली शांतताकोरोनाच्या विषाणू संदर्भात जनतेचा कर्फ्यू जिल्ह्यात शांततेत पार पाडला. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मी स्वत: जिल्ह्याच्या ठिकठिकाणी दौरा करुन पाहणी केली. कायद्याची संचारबंदी असल्यासारखी जनतेने संचारबंदी ठेवली होती. अशाच प्रकारचे सहकार्य अपेक्षीत आहे.- मंगेश शिंदे, पोलीस अधीक्षक
जिल्ह्यात स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST
रविवारी सकाळी ७ वाजपासून तर २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजतापर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल. संपूर्ण खासगी, कॉपोर्रेट कंपन्या आणि आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. गोंदिया शहरासह आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, गोरेगाव, तिरोडा या तालुक्यांत शंभरटक्के बंद पाळण्यात आला होता.
जिल्ह्यात स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !
ठळक मुद्देघराबाहेर विनाकारण पडल्यास कारवाई गोंदिया, आमगाव, देवरी, सडक-अर्जुनीसह जिल्हा बंद