शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
4
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
5
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
6
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
7
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
8
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
9
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
10
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
11
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
12
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
13
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
15
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
16
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
17
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
18
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
19
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
20
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा

विशेष योजनांना जनजागृतीची गरज

By admin | Updated: May 27, 2014 00:56 IST

शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचा प्रसार व्हावा, त्यांना योजनांचा लाभ तात्काळ मिळावा या उद्देशाने शासन विविध माध्यमातून योजनांची जाहिरात करते. मात्र स्थानिक प्रशासनाच्या

दिलीप चव्हाण - गोरेगाव

शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचा प्रसार व्हावा, त्यांना योजनांचा लाभ तात्काळ मिळावा या उद्देशाने शासन विविध माध्यमातून योजनांची जाहिरात करते. मात्र स्थानिक प्रशासनाच्या जनजागृतीअभावी सदर योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेक नागरिक पात्र असतानाही योजनांचा लाभापासून वंचित आहेत. विशेष सहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्टÑीय अपंग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्टÑीय विधवा निवृत्ती वेतन योजना, राष्टÑीय कुटुंब लाभ योजना आम आदमी विमा योजना या योजना चालविल्या जातात. या सर्व योजना स्थानिक पातळीवर महसुली यंत्रणेमार्फत राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी स्थानिट पटवारी व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावे लागते. निकषात बसणार्‍या अर्जदारास योजनेचा लाभ घेता येतो यासाठी शासनाने नेमलेल्या समितीच्या माध्यमातून लाभार्थी निकषात बसतो किंवा नाही त्यानुसार निर्णय घेतले जातात. मात्र शासनाच्या या योजना जनजागृतीअभावी रखडल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. शासनाच्या वरील सर्व योजनांचा लाभ बँक, पोष्ट आॅफीसच्या माध्यमातून दिला जातो. या सर्व योजनेतून मिळणारा लाभ केंद्र शासन व राज्या शासनाकडून दिला जातो. शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत ५६ वर्षावरील २१ हजारांच्या आत उत्पादन असणार्‍या नागरिकांना कलाभ घेता येतो. या योजनेत ६०० रुपये प्रतिमाह निवृत्ती वेतन देता येते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील वृद्धांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योनजा (गट ब) मधून ४०० रुपये व केंद्र शासनाकडून २०० रुपये, असे एकूण ६०० रुपये प्रतिमहिना लाभार्थ्यांना दिले जाते. इंदिरा गांधी राष्टÑीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेत ६० ते ६५ वर्षावरील दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती पात्र ठरतात. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेत ४० ते ४५ वर्षापेक्षा कमी वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील विधवा या योजनेत पात्र ठरतात. या योजनेच्या माध्यमातून ६०० रुपये दरमहा मानधन दिले जाते. इंदिरा गांधी राष्टÑीय अपंग निवृत्तीवेतन योजनेत ८० टक्के पेक्षा जास्त दारिद्र्य रेषेखालील १८ ते ६५ वयोगटातील लाभार्थ्यांना लाभ मिळतो. या लाभार्थ्यांना केंद्र शासन व राज्य सरकार कडून ६०० रुपये निवृत्तीवेतन देण्यात येतो. राष्टÑीय कुटुंब लाभ योजनेत १८ ते ५९ वयोमर्यादा असणार्‍या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना लाभ घेता येतो. १८ आॅक्टोबर २०१२ पासून सदर योजना सुरू असून या योजनेतील निकष बदलविण्यात आले आहेत.