रेल्वेचे विशेष तपासणी अभियान : गोंदिया रेल्वे स्थानकात गुरूवारी (दि.१३) विशेष तपासणी अभियान राबविण्यात आले. यात विनातिकीट प्रवास, गाडीच्या दारावर बसणे, महिला व अपंगांसाठी राखीव असलेल्या बोगीतून प्रवास व नियमबाह्य प्रवास करणाऱ्या एकूण ११५ प्रवाशांना पकडण्यात आले. यापैकी ९५ प्रवाशांकडून २१ हजार ५९० रूपयांचे दंड वसूल करण्यात आले. तर याशिवाय रेल्वे सुरक्षा दलाच्या क्राईम ब्रँचने २० प्रवाशांना पकडले त्यांच्याकडून आठ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या अभियानात पकडण्यात आलेल्या ११५ प्रवाशांपैकी १० जणांनी दंड भरण्यास नकार दिला. या नकार देणाऱ्या प्रवाशांना न्यायाधीशांनी त्यांचे कोर्ट सुरू असेपर्यंत उभे राहण्याची शिक्षा ठोठावली.
रेल्वेचे विशेष तपासणी अभियान :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 01:10 IST