येथील जगन्नाथ मंदिर पूजा कमिटीच्यावतीने शनिवारी शहरात श्री जगन्नाथ स्वामी यांची रथयात्रा काढण्यात आली. डब्लिंग कॉलनी स्थित जगन्नाथ मंदिरातून काढण्यात आलेली ही शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गांनी निघाली. या रथयात्रेत सहभागी भाविकांनी जगन्नाथ स्वामींचा रथ हाताने ओढत नेला. यावेळी परिसर ‘बोल हरी...’ च्या जयघोषाने दणाणून गेला होता.
बोल हरी... :
By admin | Updated: July 19, 2015 01:27 IST