शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

सुटबुटातील स्वच्छता दूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:40 IST

देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छताही अधिक महत्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी मानत असत. त्यामुळेच स्वच्छ व स्वयंपूर्ण खेडी करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु काळाच्या ओघात खेड्यांकडे दुर्लक्ष झाले. गल्ली बोळातील कचऱ्याने तर मोठे संकट उभे केले.

ठळक मुद्देदररोज दोन तास स्वच्छता अभियान : उच्च विद्याविभूषीत युवकाचा उपक्रम

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छताही अधिक महत्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी मानत असत. त्यामुळेच स्वच्छ व स्वयंपूर्ण खेडी करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु काळाच्या ओघात खेड्यांकडे दुर्लक्ष झाले. गल्ली बोळातील कचऱ्याने तर मोठे संकट उभे केले. शेवटी स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभारणे सरकारला क्रमप्राप्त ठरले. मात्र सध्यास्थितीत स्वच्छता अभियान केवळ कागदावरच असल्याचे पाहून एका तेवीस वर्षाच्या अधिकाऱ्यांने कुठलीही तमा न बाळगता गोरेगाव शहरात स्वच्छतेचा विडा उचलला. सुट बुटातील स्वच्छता दूताला पाहुन सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसल्या शिवाय राहणार नाही.विठ्ठल कवठे राहणार बोहिंदे (सोलापूर) असे त्यांचे नाव आहे. ते गोरेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विठ्ठल कवठे सप्टेंबर २०१८ ला गोरेगावच्या तालुका कृषी कार्यालयात रुजू झाले. तेव्हापासून ते सकाळी एक तास व सायंकाळी एक तास स्वच्छता अभियान एकटेच राबवितात.दोन्ही हातात मौजे, पाठीवर, लॅपटॉपची बॅग व एका हातात डस्टबिन घेवून जिथे कचरा दिसेल तेथे जाऊन कचरा उचलतात व तो कचरा कचरा पेटीत टाकतात. मागील चार महिन्यांपासृून ते गोरेगाव नगरवासीयांना सेवा देत आहे. रविवारी (दि.३०) सकाळी ८ वाजता स्वच्छता अभियान राबवितांना ते लोकमत प्रतिनिधीच्या नजरेस पडले. विठ्ठल कवठे यांनी आजपर्यंत बºयाच जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविले आहे.विशेष म्हणजे ते कुठेही गेले तरी त्यांची डस्टबिन त्यांची साथ सोडत नाही. शनिवारी (दि.२९) ला विदर्भ एक्सप्रेस या ट्रेनने गोंदियाला येत असताना त्यांनी रेल्वे गाडीत कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबविली. कर्तव्यावर असताना दोन तास तर सुटीच्या दिवशी चार तास स्वच्छता अभियान राबविणे असा त्यांचा नित्यक्रम आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोहिंदे या खेडेगावात विठ्ठलचा जन्म झाला.ज्या समाजात आपण जगलो मोठे झालो त्या समाजासाठी काही घेणे अन देणे आहे. या विचाराचा त्याच्या आयुष्यावर मोठा प्रभाव आहे. ही संपूर्ण भूमी कचरामुक्त झाली पाहिजे या हळव्या ध्यासाप्रती आपण अखंड स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगीतले.कार्यालयीन वेळेवर शासनाचे कामे करायची व उर्वरीत वेळेवर स्वच्छता अभियानात स्वत:ला झोकून द्यायचे या उर्मीने विठ्ठल काम करतो. गेल्या चार महिन्यापासून विठ्ठल गोरेगाव शहरात स्वच्छता अभियान राबवित असला तरी असंवेदनशिल गोरेगाववासीयांनी विठ्ठलाच्या दोन हाताला चार करण्याचे धाडस दाखविले नाही. आजही विठ्ठल एकटाच कचरा उचलतो एकटाच पुढे जातो मागे मात्र असंवेदनशिल लोकांचा साधा मागमुसही नाही.डस्टबिनची साथ सोडली नाही...सध्या काहीजण स्वच्छता अभियान हे केवळ फोटो सेशन पुरते करतात. त्यानंतर ते कधीही स्वच्छतेसाठी प्रयत्न करीेत नाही. मात्र विठ्ठल कवठे हे कुठेही गेले तरी त्यांच्यासोबत डस्टबिन कायम असतो. ते रस्त्यावरील व रेल्वे गाडीने प्रवास करीत असताना कचरा गोळा करुन डस्टबीनमध्ये टाकतात. हा त्यांचा नित्यक्रम मागील काही वर्षांपासून सुरू आहे.स्वयंप्रेरणेतून स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. स्वच्छता स्वत:पासून झाली पाहिजे. स्वच्छ परिसर ठेवणे व स्वच्छता राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ही भावना ज्यावेळी प्रत्येकाच्या मनात येईल तेव्हा मात्र ही भूमी कचरा मुक्त होईल.-विठ्ठल कवठे, मंडळ अधिकारी, कृषी कार्यालय गोरेगाव

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान