शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

समाजसेवी युवक ठरले स्थलांतरित मजुरांचे देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

राहत्या ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक मजूर आपल्या राज्यतून दुसºया राज्यात जातात. अशा मजुरांचे या ‘लॉकडाऊन’मध्ये हाल होत आहेत. रोजगार गेला, खाण्याचे वांदे, उपासमारीची पाळी आली. या परिस्थितीत मजुरांनी गावाकडे धाव घेतली. वाहतूक व्यवस्था नाही म्हणून शेकडो किलोमीटरचे अंतर पायीच गाठण्याची मानसीक तयारी केली.

ठळक मुद्देरोज शंभरावर मजुरांना अन्नदान : ‘लॉकडाऊन’च्या इफेक्टमध्ये दिला मदतीचा हात

राधेश्याम भेंडारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने २५ मार्च पासून ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. यामुळे देशातील वाहतुकीच्या सर्व सुविधा ठप्प झाल्या. याचा सर्वाधिक फटका परराज्यात रोजगारासाठी गेलेल्या मजुरांना बसला. ‘लॉकडाऊन’मुळे मिळणारा रोजगार गेल्याने अनेक मजूर आपले गाव गाठण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास पायीच करु न आपल्या घराकडे परतत आहे. तहान भुकेची चिंता न करता जीवासाठी पायपीट करणाऱ्या या मजुरांसाठी येथील काही समाज सेवक युवक समोर आले. मजुरांच्या अन्नाची सोय करून ते या स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत ठरत आहेत.राहत्या ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक मजूर आपल्या राज्यतून दुसºया राज्यात जातात. अशा मजुरांचे या ‘लॉकडाऊन’मध्ये हाल होत आहेत. रोजगार गेला, खाण्याचे वांदे, उपासमारीची पाळी आली. या परिस्थितीत मजुरांनी गावाकडे धाव घेतली. वाहतूक व्यवस्था नाही म्हणून शेकडो किलोमीटरचे अंतर पायीच गाठण्याची मानसीक तयारी केली. हैद्राबाद, आंध्रप्रदेश आणि तेलगंणा राज्यातून मजुरांचे पायी चालणारे जत्थे रोज मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात जाण्यासाठी अर्जुनी-मोरगाव परिसराततून जात आहेत. डोक्यावर सामानाचे ओझे, कंबरेवर लहान मुले आणि भूक व तहानेने व्याकुळ मजूर बघून मन हेलावून जाते. या स्थलांतरण करणाºया मजुरांना अन्न व विश्रांती करण्यासाठी निवारा देण्याचे निस्वार्थ काम येथील समाज सेवी युवकांनी हाती घेतले आहे.कुठेही असे मजूर दिसले की आम्हाला फोन करा असे आवाहन सोशल मीडियावर त्यांनी केले आहे. येथील उमेश दुबे, धिरेन जीवानी, रामू जीवानी, शाम चांडक, अश्विन गौतम, संजय पवार यांच्या सोबतीला नगराध्यक्ष किशोर शहारे, नगरसेवक प्रकाश उईके, छत्रपाल कापगते, डॉ.भूपेश मडावी हे दिवसरात्र, उन्हातान्हात अशा मजुरांच्या शोधात भटकंती करतात. मजुरांना एका ठिकाणी जमा करून ‘सोशल डिस्टंसिंग’ पाळत त्यांना पोटभर अन्न देतात. एवढच नाही तर पुढच्या प्रवासासाठी पार्सल व शक्य झाल्यास पुढच्या प्रवासाची सोय उपलब्ध करून देत आहेत. १०० लोकांच्या जेवणाची सोय रोजच सुरू आहे. आजतागायत हजारावर मजुरांची त्यांनी भूक शमविली आहे. स्वत: रात्री उशिरापर्यंत कुठलीच अपेक्षा न ठेवता स्थलांतरित मजुरांसाठी हे युवक देवदूताचे काम करीत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsocial workerसमाजसेवक