शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

अनाथ वधू-वरांच्या लग्नपत्रिकेतून सामाजिक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:45 PM

जवळ बक्कळ पैसा असला की त्याची गुंतवणूक कशी करायची याचाच माणूस विचार करतो, परंतु जवळ पैसा नाही, हक्काने डोक्यावर हात ठेवणारे आई-वडील नाही, तरी एका अनाथ उपवर-वधूनी त्यांच्या लग्नपत्रिकेतून सामाजिकता जोपासण्याचे आवाहन केले. अशा समाजमूल्य जोपासणारे वधू-वरांच्या जीवनातील बुधवारी (दि.२६) लगीनगाठ पडली.

ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार : सामाजिक न्याय दिनी झाले विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जवळ बक्कळ पैसा असला की त्याची गुंतवणूक कशी करायची याचाच माणूस विचार करतो, परंतु जवळ पैसा नाही, हक्काने डोक्यावर हात ठेवणारे आई-वडील नाही, तरी एका अनाथ उपवर-वधूनी त्यांच्या लग्नपत्रिकेतून सामाजिकता जोपासण्याचे आवाहन केले. अशा समाजमूल्य जोपासणारे वधू-वरांच्या जीवनातील बुधवारी (दि.२६) लगीनगाठ पडली.गोंदिया तालुक्यातील आसोली येथील रहिवासी बादल व एकता या दोन्ही वधूवरांच्या डोक्यावरुन आई-वडीलांचे छत्र सात आठ वर्षांपूर्वीच हरपले. या अनाथ वधू-वरांनी समाज संदेश देणारी लग्नपत्रिका तयार करुन समाजासमोर एक आदर्श ठेवला. लग्नपत्रिकेत प्रथमच मुलगा-मुलगी समान असून त्यांना समान लेखण्याचे आवाहन केले आहे. पुढे सेव्ह ट्रीच्या लोगोद्वारे झाडे व पाणी वाचविण्याचे आवाहन केले आहे. मानवाने नेत्रदान व रक्तदान करुन मदतीची परंपरा जोपासण्याचे तसेच स्वच्छ भारत अभियानाचा लोगोद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे.समाजसेवा, मूल्यशिक्षण, पर्यावरण यातून राष्ट्राचे रक्षण व मतदान हे कर्तव्य असून ते बजावण्याचे आवाहन केले आहे. सर्व शिक्षण मोहिमेच्या लोगोद्वारे शिक्षणाचे आवाहन करण्यात आले. देशाचे रक्षण करणारे जवान व पोषण करणारे किसान यांना मानवंदनापण लग्नपत्रिकेतून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लग्नात येताना वधू-वरांसाठी भेटवस्तू न आणता अनाथ मुलांसाठी नोटबुक आणण्याचे आवाहन करुन शिक्षणाला पुरस्कृत करण्यात आले होते. सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून बादल व एकता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकले. शिवाय विवाह सोहळ्यातून बादल व एकता यांनी जाती पातीचे बंध तोडा भारत जोडा भारत जोडा असा संदेश दिला आहे.कोण आहे बादलबादल बालकदास गजभिये हा गोंदिया तालुक्यातील आसोली येथील रहिवासी आहे.२०१३ मध्ये बादलवरील आईचे छत्र हरपले. यानंतर अंत्यत विपरित परिस्थितीत बुध्द विहारात अभ्यास करुन बादलने स्पर्धा परीक्षा उर्तीण केली. लोको पायलटच्या मेरिट लिस्टमध्ये त्याच नाव आले आहे. बादलची आई कॅन्सरशी झुंज देत होती.तिच्या उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते तेव्हा बादल व त्यांच्या दोन भावडांनी मिळेल ते काम करुन आईवर उपचार केले.मात्र नियतीने त्यांच्यावरील आईचे छत्र हिरावून घेतले.मात्र यानंतर बादलने न डगमगता सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर यांच्या मदतीने त्याने आपले ध्येय गाठले.त्यानंतर त्यांच्या पुढाकाराने तो आज सामाजिक न्यायदिनी विवाहबंधनात अडकला.विविध मान्यवरांची उपस्थितीबादल आणि एकता हे सामाजिक न्याय दिनी विवाहबंधनात अडकले. त्यांना आर्शीवाद देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता शाहू, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, जि.प.समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.हाश्मी, सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखडे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर, सेवानिवृत्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके उपस्थित होते.