आतापर्यंत १३२८ जणांचे स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 05:00 AM2020-06-19T05:00:00+5:302020-06-19T05:00:36+5:30

दुबई आणि दिल्लीहून परतलेल्या नागरिकांमुळे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. १२ जून रोजी तिरोडा तालुक्यातील दुबईहून परतलेल्या एका जणाच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर याच व्यक्तीसह आलेले दोन जण कोरोना बाधित आढळले. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ झाली.

So far 1328 swab samples have been corona negative | आतापर्यंत १३२८ जणांचे स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह

आतापर्यंत १३२८ जणांचे स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह

Next
ठळक मुद्दे८२ स्वॅब नमुन्यांच्या अहवाल अप्राप्त : गुरूवारचा दिवस ठरला दिलासादायक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण १५१२ जणांचे स्वॅब नमुने घेवून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. यापैकी १०२ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले तर १३२८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. ८२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ होत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली होती. मात्र गुरूवारी (दि.१८)जिल्ह्यात नवीन रुग्ण न आढळल्याने दिलासा मिळाला आहे.
दुबई आणि दिल्लीहून परतलेल्या नागरिकांमुळे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. १२ जून रोजी तिरोडा तालुक्यातील दुबईहून परतलेल्या एका जणाच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर याच व्यक्तीसह आलेले दोन जण कोरोना बाधित आढळले. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ झाली. त्यामुळे केवळ सहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधितांचा आकडा ३३ वर पोहचला. सुदैवाने दुबई आणि दिल्लीहून परतलेल्या नागरिकांचा त्यांच्या गावाशी संपर्क न आल्याने आणि त्यांना क्वारंटाईन करुन ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग टाळण्यास मदत झाली.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा १०२ वर पोहचला असून यापैकी ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. तर ३३ कोरोना बाधितांवर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गोंदिया येथे स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरू झाल्याने स्वॅब नमुन्यांच्या चाचणीचे प्रमाण देखील वाढविण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने घेतलेल्या ८२ नमुन्यांचा अहवाल गोंदिया प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. गुरूवारी जिल्ह्यात नवीन कोरोना बाधिताची नोंद न झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला.
 

Web Title: So far 1328 swab samples have been corona negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.