शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीच्या धाकावर ड्रायव्हरचा मोबाईल हिसकावून नेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 05:00 IST

एका स्कूटीवर दोन ईसम आले. त्यांनी आपले वाहन मालवाहक समोर आडवे करून मालवाहक थांबविली. तसेच, दोघांनी संतकुमारच्या गळ्यावर तलवार रोखून १० हजार रुपये दे, अन्यथा तुला ठार करू, अशी धमकी दिली.  संतकुमार यांनी आपल्याकडे पैसे नाहीत, असे म्हटल्यावर आरोपींनी त्यांच्या जवळचा १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला व दोघेही स्कूटी घेऊन छोटा गोंदियाकडे पसार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  लगतच्या ग्राम नागरा-कटंगी येथील वाहनचालक संतकुमार नंदकिशोर सुलाखे (२६) यांच्या गळ्यावर तलवार रोखून दोघांनी मोबाईल हिसकावून नेला होता. त्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.४) करण्यात आली आहे. या प्रकणात अटक करण्यात आलेल्या आरोपींजवळून तलवार जप्त करण्यात आली आहे.   नागरा-कटंगी येथील संतकुमार सुलाखे  टाटा एस मालवाहक क्रमांक एमएच २१-एक्स ०२४१ वर काम करतात. शुक्रवारी (दि.३) सायंकाळी ४ वाजतादरम्यान ते गाडीत साहित्य भरून दतोरा येथे गेले होते. तेथे साहित्य सोडून करून सिव्हिल लाईन इंगळे चौकातील बोडीजवळ आले असता एका स्कूटीवर दोन ईसम आले. त्यांनी आपले वाहन मालवाहक समोर आडवे करून मालवाहक थांबविली. तसेच, दोघांनी संतकुमारच्या गळ्यावर तलवार रोखून १० हजार रुपये दे, अन्यथा तुला ठार करू, अशी धमकी दिली. संतकुमार यांनी आपल्याकडे पैसे नाहीत, असे म्हटल्यावर आरोपींनी त्यांच्या जवळचा १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला व दोघेही स्कूटी घेऊन छोटा गोंदियाकडे पसार झाले. या घटनेची तक्रार संतकुमार यांनी शनिवारी (दि. ४) करताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड व सहकाऱ्यांनी शहरात सर्च मोहीम राबवून आरोपी शैलेश प्रीतम टेंभरे (२६, रा. नवाटोला-नागरा)  व सोनू ऊर्फ गोपाल चव्हाण (३८, रा. गौशाला वॉर्ड) यांना अटक केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी