शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कल्लू यादव गोळीबार प्रकरणात आणखी सहा आरोपींना केली अटक

By अंकुश गुंडावार | Updated: March 8, 2025 18:50 IST

Gondia : मुख्य आरोपीने चौकशीत दिली माहिती

गोंदिया : कल्लू यादव गोळीबार प्रकरणातील मास्टरमाइंड प्रशांत मेश्राम याला मंगळवारी (दि. ४) अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्याला रिमांडमध्ये घेतल्यानंतर चौकशीत आणखी सहा आरोपींची नावे त्याने घेतली. याआधारे पोलिसांनी त्या सहा आरोपींना विविध ठिकाणांवरून अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. यातील चार आरोपी शहर व लगतच्या परिसरातील असून, दोघे मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट येथील आहेत. ११ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लू सुंदरलाल यादव (४२, यादव चौक, गोंदिया) यांना दोन अनोळखी आरोपींनी संगनमत करून बंदुकीने गोळी मारून ठार करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात तक्रारदार लक्की यादव (रा. बाराखोली, सिंधी कॉलनी) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध शहर पोलिस ठाणे येथे भादंवि कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल असून, तपास सुरूच आहे. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच नऊ आरोपींना अटक केली. तर मंगळवारी (दि. ४) प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रशांत उत्तम मेश्राम (रा. भीमनगर) याला अटक करण्यात आली. त्याची पोलिस कोठडी घेऊन चौकशी केली असता, त्याने आणखी सहा साथीदारांची नावे घेतली. याआधारे पोलिसांनी त्या सहा आरोपींना अटक केली असून, आता या प्रकरणात आरोपींची संख्या १६ झाली आहे. 

या सहा आरोपींना केली अटकप्रशांत मेश्रामच्या माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी (दि. ७) निखिलेश ऊर्फ निगम प्रकाश मेश्राम (२४, रा. फुलचुरपेठ), हर्ष अभय गजभिये (२२, रा. बाजपेयी चौक), उत्तम दुलिचंद गेडाम (५०, रा. कुंभारटोली) यांना बुधवारी (दि. ५) तसेच आरोपी चेतेश ऊर्फ चेतू धनराज कटरे (३०, रा. फुलचूर पेठ, आयटीआयजवळ) यास गुरुवारी (दि. ६) वेगवेगळया ठिकाणांवरून कोम्बिंग ऑपरेशन राबवून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कुलदीप भादू खरवडे (४०, रा. मनझारा, जि. बालाघाट) आणि खिलेंद्र हिरासिंग धुर्वे (३६,रा. टेकाडी-शिरपूर, जि. बालाघाट) यांनी देशी बनावटीची पिस्टल पुरविल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सुद्धा शुक्रवारी (दि. ७) अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना सोमवारपर्यंत (दि. १०) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपींवर आहेत यापूर्वीचेही गुन्हे नोंद

पोलिसांनी अटक केलेल्या चेतेश कटरे याच्या घराची झडती घेतली असता, एक देशी बनावटीची पिस्टल (कट्टा) मिळून आली आहे. आरोपी चेतू कटरे याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असून, पिस्टल गुन्ह्यामध्ये रीतसर जप्त करण्यात आली आहे. तर आरोपी खिलेंद्र धुर्वे याच्यावर बालाघाट पोलिस ठाण्यात देशी बनावटीची पिस्टल पुरविल्याबाबत यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. 

दोन पिस्टल व दोन मोटारसायकली जप्तप्रशांत मेश्राम याला अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाला आणखी वेगळे वळण आले असून, नवनवीन बाबी उघडकीस येत आहेत. तर या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत एकूण १६ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून देशी बनावटीच्या दोन पिस्टल व तीन काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. गुन्ह्याचा तपास ठाणेदार किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात सपोनि वैभव गेडाम करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया