शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सहा मुलांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 21:33 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना शाळाबाह्य मुलांची माहिती मागीतली तेव्हा ती यादी शून्य दाखविली जाते. परंतु वास्तविकता वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शाळाबाह्य मूल शोध मोहीम राबविली जात आहे. यामुळे कधीच शाळेत दाखल न झालेल्या शाळाबाह्य मुलांना शोधण्याचा उपक्रम जिल्ह्यात सुरू आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे कार्य : शिक्षणापासून मुले वंचित राहू नये यासाठी खटाटोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भीक मागून पोट भरणाऱ्या व बालमजुरी करणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. त्यांतर्गत एकही बालक शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार, अर्जुनी-मोरगाव व गोंदिया या दोन तालुक्यांत सहा शाळाबाह्य मुलांना शोधून त्यांना शाळेत दाखल कण्यात आले आहे.एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये व त्या मुलांना गुणवत्तायुक्त शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई कायद्यांतर्गत तजविज केली. तसेच स्थानिक प्राधीकरणातील प्रत्येक पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची आहे हे नमूद केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना शाळाबाह्य मुलांची माहिती मागीतली तेव्हा ती यादी शून्य दाखविली जाते. परंतु वास्तविकता वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शाळाबाह्य मूल शोध मोहीम राबविली जात आहे.यामुळे कधीच शाळेत दाखल न झालेल्या शाळाबाह्य मुलांना शोधण्याचा उपक्रम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात शहरा लगतच्या ग्राम कुडवा व रेल्वेस्थानक, तिरोडा तालुक्यातील ग्राम काचेवानी, मुंडीकोटा व सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड येथे भीक मागणाऱ्या, मांग-गारुडी, लोहार व फिरणाऱ्या नाथजोगींच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागासमोर ‘शाळाबाह्य मूल दाखवा एक हजार रूपये मिळवा’ असे जनजागृती करणारे फलकही लावले आहे.शिक्षकांनीच शाळाबाह्य मूल शोधण्यासाठी प्रयत्न केलेत. २१ ऑगस्ट रोजी ग्राम कुडवा येथील मुलांच्या शाळेत चार शाळाबाह्य मुलांना दाखल करण्यात आले. तर २३ ऑगस्ट रोजी भविष्य सांगणाऱ्यांच्या दोन मुलींना अर्जुनी-मोरगाव येथील शिक्षण विभागाच्या चमूने शाळेत घातले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम कुंभीटोला येथील शाळेत त्यांना दाखल करण्यात आले असून शिक्षण हमी कार्ड देण्यात आले आहे. केंद्रप्रमुख एम.बी. रतनपुरे व इतरांनी त्यांना दाखल करून घेतले.जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम सुरूअर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम कुंभीटोला येथील जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्यात आलेल्या मुलींची नावे करीमा ज्ञानेश्वर गुजर व आचल संजय वालके (रा. सेलू, कळमेश्वर, जि. नागपूर) अशी आहे. तर कुडवा येथील शाळेत दाखल करण्यात आलेल्या चार मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्यात आले. जिल्हाभरात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम सुरू आहे.

टॅग्स :Educationशिक्षण