शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सिरेगाव ग्रामपंचायत राज्यात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 14:58 IST

२५ वर्षात प्रथमच पहिले स्थान : २३ सप्टेंबरला होणार पुरस्काराचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८-१९ अंतर्गत राबविण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारासाठी जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध ग्रामपंचायत पात्र ठरली आहे. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा २३ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे.

सन २०१८-१९ या वर्षासाठी राबविण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी जिल्हा परिषद गटातून पात्र ठरलेल्या सिरेगाव बांध ग्रा.पं.ची जिल्हास्तरीय तपासणी समितीकडून तपासणी करण्यात आली. यात जिल्हास्तरावर देवरी तालुक्यातील भागी प्रथम तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध ग्रा.पं. ने द्वितीय क्रमांक प्राप्त करीत दोन्ही ग्रामपंचायती विभागीय पुरस्कारासाठी पात्र ठरल्या होत्या. 

विभागीय स्पर्धेत या दोन्ही ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या. या ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय तपासणी ६ ते ८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान समिती अध्यक्षांचे प्रतिनिधी व अवर सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालय मुंबई चंद्रकांत मोरे, समिती सदस्य तसेच कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे, सहायक कक्ष अधिकारी पात्रे यांनी केली होती. राज्यस्तरीय स्पर्धेत कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती या सहा विभागातून १४ ग्रामपंचायती राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सिरेगाव बांध ग्रामपंचायतीचे जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, उपाध्यक्ष यशवंत गणवीर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग आनंदराव पिंगळे, जिल्हा समन्वयक व शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार भागचंद्र रहांगडाले यांनी कौतुक केले आहे. 

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी हे सन्मानित होणार संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविताना अभियान कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यमान जिल्हाधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषद गोंदियाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व विद्यमान जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग अनिल पाटील यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. 

२५ वर्षानंतर प्रथमच बहुमान गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाल्याला २५ वर्षे पूर्ण झाली आहे. या कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात प्रथमच राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार सिरेगाव ग्रामपं चायतीच्या रुपाने जिल्ह्याला मिळाला आहे.

"अनेक वर्षानंतर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारासाठी पात्र ठरली असल्याने निश्चितच जिल्ह्यासाठी कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन गावाचा विकास साधावा." - पंकज रहांगडाले, जि.प.अध्यक्ष, गोंदिया 

"सिरेगाव बांध सारखी छोटीशी ग्रामपंचायत आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर राज्यस्तरावर जाऊन पुरस्कार प्राप्त करते हे कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही या ग्रामपंचायतीचे अनुकरण करीत गावे आदर्श करण्यावर भर द्यावा." - मुरगानंथम एम, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी

टॅग्स :gondiya-acगोंदियाgram panchayatग्राम पंचायत