शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

दुकानदारांचे सामान व बोर्ड परत येऊ लागले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST

नगरपरिषद म्हणा की, वाहतूक नियंत्रण शाखा दोन्ही विभागांकडे मनुष्यबळ कमी असल्याने आहे तेवढ्या मनुष्यबळात ते काम करून घेत आहेत. त्यात होळीचा सण होता व अशात नागरिक व दुकानदारांनाही त्रास व त्यांचे नुकसान नको म्हणून या मोहिमेला खंड पडला. मात्र दुकानदारांनी त्याचा गैरफायदा घेत सामान व बोर्ड रस्त्यावर ठेवणे सुरू केले आहे. अशात आता मोहीम राबविल्यास मात्र काहीही न सांगता थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाजारात दुकानदारांकडून दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर मांडले जात असल्याने नागरिकांना वाहन ठेवण्यास अडचण होते. येथूनच वाहतुकीची डोकेदुखी सुरू होत असल्याने नगरपरिषद व वाहतूक नियंत्रण शाखेने मोहीम छेडली होती. मात्र या मोहिमेला खंड पडताच दुकानदारांकडून पुन्हा दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आल्याचे दिसत आहे. बाजारातील रस्ते अगोदरच अरूंद आहेत त्यात दुकानदार आपल्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. यामुळे नागरिकांना वाहन ठेवताना अडचण होते. परिणामी नागरिक खरेदीसाठी आले तर, रस्त्यावरच वाहन ठेऊन मोकळे होतात. येथूनच वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते व जागोजागी ट्राफिक जामची समस्या उद्भवते. यामुळे नागिरकांना विनाकारण डोकेदुखी व त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी स्वत: बघितला व अनुभवला आहे. यामुळेच त्यांनी नगरपरिषद व वाहतूक नियंत्रण शाखेला संयुक्तरित्या मोहीम छेडून रस्ते मोकळे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.   यावर ८ मार्च रोजी नगरपरिषद व वाहतूक नियंत्रण शाखेने मोहीम छेडली व रस्त्यावर असलेले दुकानदारांचे सामान व बोर्ड हटवून घेतले होते. त्यानंतर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी स्वत: उपस्थित राहून मोहीम छेडली होती. खास बात म्हणजे,नगरपरिषदेचे पथक किंवा वाहतूक पोलीस दिसल्यास दुकानदार तेवढ्यापुरते सामान व बोर्ड उचलून आत नेतात. मात्र त्यानंतर चित्र होते तेच दिसून येते. आता मोहिमेला सुमारे आठवड्याभराचा खंड पडला आहे. परिणामी दुकानदारांचे सामान व बोर्ड पुन्हा रस्त्यावर आल्याचे दिसत आहे. 

आता थेट जप्तीची कारवाई - नगरपरिषद म्हणा की, वाहतूक नियंत्रण शाखा दोन्ही विभागांकडे मनुष्यबळ कमी असल्याने आहे तेवढ्या मनुष्यबळात ते काम करून घेत आहेत. त्यात होळीचा सण होता व अशात नागरिक व दुकानदारांनाही त्रास व त्यांचे नुकसान नको म्हणून या मोहिमेला खंड पडला. मात्र दुकानदारांनी त्याचा गैरफायदा घेत सामान व बोर्ड रस्त्यावर ठेवणे सुरू केले आहे. अशात आता मोहीम राबविल्यास मात्र काहीही न सांगता थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. 

आतापर्यंत २ वेळा मोहीम राबविली असून दुकानदारांना समजावून सांगितले आहे. मात्र त्यानंतरही परिस्थिती तीच दिसून येत आहे. अशात आता मोहीम राबविल्यास काहीही न सांगता सामानाची जप्ती करून न्यायालयात केस पाठविली जाईल. त्यामुळे दुकानदारांनी सामान रस्त्यावर न ठेवता सहकार्य करावे. - दिनेश तायडे निरीक्षक,वाहतूक नियंत्रण शाखा

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण