शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शिवशाही फिटनेसमध्ये अडली, लालपरीला मागणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2022 05:00 IST

जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा असे दोन आगार असून, फक्त गोंदिया आगारालाच ४ शिवशाही देण्यात आल्या आहेत. या शिवशाही वातानुकूलित असल्याने, वरातीसाठी नागरिक आरागात बुकिंगसाठी येत असल्याची माहिती आहे. मात्र, शिवशाही उपलब्ध नसल्याने आगाराला नुकसान सहन करावे लागत आहे. आता सुमारे महिना होत असूनही शिवशाही पासिंग होऊन आलेली नाही. 

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे सर्वच कर्मचारी कामावर परतले असून, आगारांचे कामकाज पुन्हा एकदा सुरळीत झाले. विशेष म्हणजे, लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने, आगारांना झालेले नुकसान भरून काढण्याची चांगलीच संधी मिळाली आहे. मात्र, उन्हाळ्यामुळे मागणी असलेली शिवशाही भंडारा येथे आरटीओ फिटनेसमध्ये अडकून पडली आहे, तर दुसरीकडे लालपरीला मागणी नसल्याने गोंदिया आगाराला याचा फटका बसत आहे. जिल्ह्याचे तापमान ४३-४४ अंशांच्या घरात चालले असूनही लग्नसराईचा जोर काही कमी झालेला दिसत नाही. दिवस निघताच वरातीतील बँड व डीजेचा आवाज कानी पडतो. कोरोनाने २ वर्षे खराब केल्यानंतर, आता यंदा मुहूर्त साधून मोठ्या प्रमाणात कर्तव्य पार पाडले जात आहेत. यामुळेच रखरखता उन्हाळा असूनही लग्नांची संख्या कमी झालेली नाही. यामुळेच वरातीसाठी वाहनांची मागणी जोमात आहे. पूर्वी लग्नाची वरात म्हटली की, एसटीची लाल बस डोळ्यासमोर येत होती. मात्र, आता बसेसमध्येही नवनवीन मॉडेल्स उपलब्ध असल्याने व त्यातही खासगी ट्रॅव्हल्सकडून दर कमी करता येत असल्याने, आता लग्नाच्या वरातीतून लालपरी गायब झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे तापमान अंगाची लाहीलाही करीत असल्याने, वरात नेताना वऱ्हाड्यांची सोय बघून वातानुकूलित (एसी) बसेसची मागणी वाढली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडे शिवशाही वातानुकूलित असल्यामुळे सध्या शिवशाहीचीच मागणी आहे. मात्र, शिवशाही सध्या भंडारा येथे आरटीओ पासिंगसाठी गेली आहे. परिणामी, आगाराला या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नाला मुकावे लागत आहे. 

गोंदियात ४ शिवशाही जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा असे दोन आगार असून, फक्त गोंदिया आगारालाच ४ शिवशाही देण्यात आल्या आहेत. या शिवशाही वातानुकूलित असल्याने, वरातीसाठी नागरिक आरागात बुकिंगसाठी येत असल्याची माहिती आहे. मात्र, शिवशाही उपलब्ध नसल्याने आगाराला नुकसान सहन करावे लागत आहे. आता सुमारे महिना होत असूनही शिवशाही पासिंग होऊन आलेली नाही. 

वर्षभरात लग्नाचे फक्त १ बुकिंग- ऑक्टोबरपासून महामंडळातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते व त्यामुळे दिवाळीचा हंगाम आगाराच्या हातून गेला. त्यानंतर, उच्च न्यायालयाच्या आदेशाने २२ एप्रिल रोजी कर्मचारी कामावर परतले व आगाराचे कामकाज सुरळीत होऊ लागले. मात्र, आता शिवशाही नसल्याने नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे लालपरीला मागणी नसून यंदा लालपरीने फक्त फेब्रुवारी महिन्यात लग्नाचे १ बुकींग केल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportएसटी