शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेंडा परिसर तीन दिवसांपासून अंधारात

By admin | Updated: July 24, 2014 23:56 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात मागील तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे विद्युत प्रवाह खंडित झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तीन दिवसांपासून वीज पुरवठा बंद

शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात मागील तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे विद्युत प्रवाह खंडित झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तीन दिवसांपासून वीज पुरवठा बंद पडल्यामुळे नळाचे पाणी येणे बंद झाले. पिण्याच्या पाण्यासाठी गृहिणींना फार मोठी कसरत करावी लागत आहे.हा परिसर जंगलव्याप्त असल्याने लहान-मोठी झाडे विद्युत तारांवर तुटून पडले. यामध्ये विद्युत विभागाचे मोठे नुकसान झाले. वीज पुरवठा बंद झाला. परंतु त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या समस्या वाढल्या. या गावात पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून नळयोजना आहे. परंतु तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या वाढली आहे. मागील आठवड्यात लागूनच असलेल्या सालईटोला गावात वीज प्रवाह बंद असल्यामुळे काळोखाचा फायदा घेत एका इसमाचा खून करून आरोप पळून जाण्यात यशस्वी ठरला. अंधार असल्यामुळे आरोपीची ओळख होवू शकली नाही. आजही आरोपीचा शोध घेण्यासाठी देवरीची पोलीस यंत्रणा रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. परंतु अद्याप शोध लागला नाही. विजेवर आधारित उपकरणे कुचकामी ठरत आहेत. विद्युत मोटारी, मोबाईल सेवा ठप्प पडल्या आहेत. शेंडा परिसरासाठी दोन लाईनमनची नियुक्ती विद्युत विभागाने जरी केली असली तरी ते दोघेही आपल्याच मौजमस्तीत चूर राहत असल्याने वीज प्रवाह पूर्ववत होण्यास विलंब होत आहे. सदर प्रतिनिधीने देवरीचे कनिष्ठ अभियंता नगराळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता गुरूवारी वीज प्रवाह सुरू होईल, असे सांगितले. (वार्ताहर)