पांढरी : या परिसरातील ग्राम रेगेंपार येथील सुरेश भिवाजी लटये (४५) हे जंगलात तेंदुपत्ता तोडण्याकरिता गेले असताना त्यांच्यावर दोन अस्वलांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता दरम्यान घडली. लटये हे आपल्या सहकाऱ्यासोबत तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. जंगलामध्ये लपून बसलेल्या दोन अस्वलांनी अचानक हल्ला केल्याने लटये हे जखमी झाले. सोबत असलेल्या सोबत्याने दोन अस्वलांच्या ताब्यातून त्यांना सोडवून आणून प्राथमिक आरोग्य केंद्र पांढरी येथे भरती केले. प्राथमिक उपचार आरोग्य अधिकारी डॉ. गणेश गुंड यांनी केला व पुढील उपचारासाठी त्यांना सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर इसमाला गंभीर दुखापत झाली असली तरी प्रकृरी धोक्याबाहेर आहे. अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी
By admin | Updated: May 15, 2016 01:21 IST