शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दारु दुकानाला तीव्र विरोध

By admin | Updated: April 9, 2017 00:12 IST

शासनाने राज्य मार्गावरील सर्व देशी-विदेशी दारु दुकान व बीअरबारला ५०० मीटरच्या आत बंदी केली.

किडंगीपारची ग्रामसभा वादळी : दारुविक्रेत्याच्या परवानगीवरून रोष आमगाव : शासनाने राज्य मार्गावरील सर्व देशी-विदेशी दारु दुकान व बीअरबारला ५०० मीटरच्या आत बंदी केली. परंतु किंडगीपार येथील ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी देशी दारु दुकानाला हिरवी झेंडी दिल्याने नागरिक भडकले. परिणामी ७ एप्रिल रोजी आयोजित ग्रामसभेत १९० लोकांनी तीव्र विरोध दर्शवून ग्राम पंचायतला धारेवर धरले. किंडगीपार येथे देशी दारु सुरु करण्यासाठी एका व्यक्तीने अर्ज केला. यासंदर्भात ग्रामपंचायतने जाहिरनामा काढून १५ ते २२ मार्च दरम्यान आक्षेप मागविण्यात आले होते. परंतु या आक्षेपाची माहिती नागरिकांना नव्हती. त्यामुळे सरपंच व सचिवांनी दारु विक्रेत्याला आक्षेप नाही असा पत्र दिला. परंतु आक्षेप नसल्याचा प्रमाणपत्र देण्यापूर्वी ग्रामसभा घेणे आवश्यक असताना चिरीमीरी घेऊन ग्राम पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी व सचिवाने सदर कृत्य केल्याचे लक्षात आले. त्यामुळे भडकलेल्या नागरिकांनी ग्राम पंचायतला ग्रामसभा घेण्यास प्रवृत्त केले. ७ एप्रिल रोजी आयोजित ग्रामसभेत १९० महिला पुरुषांनी हजेरी लावून या दारु दुकानाला तीव्र विरोध केला. दारु विक्रेत्यांकडून पैसे मागण्यात आल्याची कबूली ग्रामसभेतच देण्यात आली. सरपंचाने चक्क तीन गेट गावासाठी बनवून द्या, अशी मागणी केल्याचे स्वत: सरपंच घनश्याम मेंढे यांनी ग्रामसभेत सांगितले. त्यामुळे आम्हाला गेट नको आमचे कुटूंब दारुमुळे उध्दवस्त करु नका, अशी मागणी करीत महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनावर तासेरे ओढले. गावातील सामाजिक कार्यकर्ते मनोहर शिवणकर व सिमा चंद्रीकापुरे यांनी गावकऱ्यांना संबोधीत केल्यामुळे नागरिक दारुबंदीसाठी एकवटले. दारुबंदी समितीच्या अध्यक्ष सुषमा कोरे, उपाध्यक्ष कांत रहिले, सचिव किरण चुटे, प्रमिला खरोेले, सेवंता भांडारकर, गुणवंता पाऊलझगडे, मुक्ता चुटे, अरुणा श्यामकुवर, मनू मेंढे, तारा महारवाडे, सिमा चंद्रीकापुरे, भुरण वाकले, अमृता पुसाम, संगीता मडावी, सरस्वता फाये, मंगला बहेकार, उर्मिला रहिले, फुलन शिवणकर, कारण शिवणकर, लिला रहिले, कमला महारवाडे, पुष्पा मडावी, मनिषा राऊत, पुस्तकला बागडे, कांता मेंढे, मधू मेंढे, शिवलीला पंधरे, गीता गौतम, मुक्ता कोरे, रमेश रहिले, दमयंती रहिले, मीरा चोरवाडे, बयना सयाम, सरीता मेंढे, मनोहर शिवणकर, देवेंद्र भांडारकर, किशोर चुटे, सोमेश्वर हरिणखेडे, लक्ष्मन मुनेश्वर, विनोद कोरे, देवराज मुनेश्वर, जीवन रहिले, गोपाल रहिले, भोजराज भांडारकर व इतर नागरिकांनी ग्रामपंचायतच्या विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त करीत दारु दुकान सुरु होणार नाही असा पवित्रा घेतला. ठाणेदाराला सरपंचाचा सवाल, ‘तुम्ही का आलात?’ दारुबंदीसाठी मार्गदर्शन करा म्हणून महिलांनी ठाणेदार प्रशांत भस्मे यांना बोलावले होते. परंतु ग्रामसभेत तुम्ही का आलात? असा सवाल सरपंच घनश्याम मेंढे यांनी ठाणेदाराला केला. त्यामुळेही नागरिकांचा आक्रोश वाढला. ठाणेदार चांगल्या कामासाठी आले असताना सरपंचानी केलेला सवाल नागरिकांना खटकला. सरपंच दारु विक्रेत्यांला सहकार्य करतात, चिरीमिरीच्या भरोश्यावर नागरिकांची दिशाभूल करून दारु विक्री करण्यासाठी सरपंच तर पुढाकार घेत नाही ना? असा आरोप नागरिकांकडून होत आहे.