शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

पांढऱ्या टोपीच्या संस्कृतीत ‘सावली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:27 IST

‘शाळा संस्काराचे मंदिर व्हावे, मुल्याधारीत विद्यार्थी घडावे, पालकांनी आपुलकी दाखवावी, बघता कण साखरेचा मुग्यांनी रांग लावावी’ याप्रमाणे विद्यार्थ्यांनी शाळेकडे धाव घ्यावी.

ठळक मुद्दे१३ वरुन पटसंख्या झाली १३८ : खुलावं फुलांनी, घडावं मुलांनी

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘शाळा संस्काराचे मंदिर व्हावे, मुल्याधारीत विद्यार्थी घडावे, पालकांनी आपुलकी दाखवावी, बघता कण साखरेचा मुग्यांनी रांग लावावी’ याप्रमाणे विद्यार्थ्यांनी शाळेकडे धाव घ्यावी. यासाठी जि.प. शाळातील शिक्षक धडपडेल तर निश्चीतच जि.प.शाळांना लागलेली गळती खरच थांबेल. गांधीजींच्या काळातील पांढºया टोपीचे जतन करीत पांढरी टोपी घालून शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची शाळा म्हणजे देवरी ताुलुक्यातील जिल्हा परिषदेची वरिष्ठ प्राथमिक सावली आहे.शाळा म्हणजे संस्काराची खाण, नीतीमुल्यांची देवाण-घेवाण, बालमनापासून संस्कार मूल्य रुजावी, संस्कारित नागरिक तयार व्हावे, आपल्या मराठी संस्कृतीची ओळख व्हावी. यासाठी सर्व मुले शाळेत पांढरी टोपी घालून सावली शाळेत येतात. देवरी तालुक्यातील आमगाव-देवरी राज्य मार्गावर आदिवासी, नक्षलग्रस्त भागात विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देणारी जिल्हा परिषदेची वरिष्ठ प्राथमिक शाळा सावली आहे.या शाळेचे प्रेरणादायी उपक्रमशील मुख्याध्यापक संदीप तिडके, त्यांच्या खांदाला-खांदा लाऊन काम करणारे शिक्षक नंदकिशोर शेंडे, रमेश ताराम, वर्षा गायकवाड, वर्षा वालदे, एच. एम. राऊत, वर्षा बडवाईक या शिक्षकरूपी वटवृक्षाच्या सावलीत सावली शाळेचे विद्यार्थी भविष्य घडवण्याची धडपड करीत आहे.मागील पाच वर्षांपासून शाळेत तीन दिवसीय वार्षिक सावली महोत्सव घेण्यात येत आहे. याद्वारे विविध क्षेत्रात काम करणारे गणमान्य व्यक्तींना बोलावून त्याचं मनोगत, प्रबोधन वर्ग, अंधश्रद्धा निर्मूलन, विद्यार्थी सांस्कृतीक कार्यक्रम, महिला मेळावा, हळदीकुंकू कार्यक्रम, विज्ञान मेळावे आयोजित केले जातात.शाळेतील उपक्रमशील शिक्षकांच्या मदतीने सुशिक्षीत पालकांचे सहकार्य, पालकसभा, विविध सामाजिक उपक्रमामार्फत पालकांना शाळा ही संस्कार मूल्य रुजवणारी व समाजमन घडविणारे विद्या मंदिर असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.आजपर्यंत ४ लाखापेक्षा जास्त निधी लोकसहभागातून गोळा करून शाळा १०० टक्के शाळा डिजिटल केली. प्रवेशद्वार, शौचालय बांधकाम, उत्कृष्ट बागकाम असे अनेक कामे केलीत.पालक पंचायत गावची शाळा ही आमची शाळा वाटावी, आम्ही घडलो तशी आमची पाल्य आमच्या गावच्या शाळेत घडावी. अशी आस पालकांना नेहमी राहायची. याला हेरुन शाळेत पालक पंचायत नावाचा उपक्रम सुरु झाला.सर्व पालक अगदी मन मोकळेपणाने शाळा विकासासाठी बोलत असतात. याचे यश म्हणजे पटसंख्या १३ वरुन १३८ वर पोहचली.शाळेचे भरारी पथकपाच-पाच विद्यार्थ्यांचे भरारी पथक तयार करण्यात आले. हे पथक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना दहा-दहा प्रश्न विचारतात. यामुळे विद्यार्थ्यांना प्रगतीच्या दारावर पाऊल टाकायला मदत होते. या व्यतिरिक्त उत्तर कळवा-बक्षीस मिळवा. सामाजिक नाटके, अपूर्व विज्ञान मेळावे, फटाके मुक्त दिवाळी, मात अंधश्रद्धेवर अशा एक ना अनेक उपक्रमांमुळे शाळा आज विद्यार्थ्यांशी आपुलकी निर्माण करीत आहे.आम्ही शिकतो आमच्या कॉन्हवेंटमध्येलाविते लळा ही जसा माऊली बाळा, तशीच आमची शाळा या प्रमाणे पूर्व प्राथमिक वर्गापासूनच मुलांनी गावातच शिकावं, इंग्रजी माध्यमांच्या प्रचलित कॉन्हवेंटसारखी नुसती पैशाच्या झाडावर उमलेली फुलं न घडता, मोफतकॉन्हवेंट असा मानस बाळगून पालक व शिक्षकांनी देवरी तालुक्यात सावली येथे प्रथम कॉन्हवेंट सुरु केले. आज गावातील २० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.सावली आयडॉल अवार्डशाळेसाठी मदत केलेल्या कामाची परतफेड व्हावी, शाळेला मदतीसाठी हात लावलेल्या गावकºयाचे ऋण फेडावे यासाठी शाळेतर्फे उत्कृष्ट सहकार्य करणाºया धडपडणाºया गावातील एका नागरिकाला सावली आयडॉल अवार्ड दिला जातो.सावली शाळेचे यशशाळेतील सर्व उपक्रमशील शिक्षक व पालकांच्या सहकार्याने शाळेने विविध क्षेत्रात यश संपादन केले आहे. सत्र २०१२-१३ मध्ये गावची शाळा आमची शााळा तालुका द्वितीय, सत्र २०१३-१४ मध्ये गावची शाळा आमची शाळा तालुका द्वितीय, सत्र २०१५-१६ मध्ये गुणवत्तेत उच्च प्राथमिक गटात प्रथम, सत्र १०१५-१६ मध्ये स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ क्रीडा जिल्हा प्राथमिक मुले गटात प्रथम क्रमांक पटकाविला.