शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
6
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
7
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
8
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
9
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
10
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
11
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
12
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
13
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
14
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
15
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
16
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
17
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
18
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
19
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
20
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले

बाल कामगारांच्या सात शाळा अधांतरी

By admin | Updated: June 11, 2014 23:15 IST

ज्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते त्या घरातील लहान मुले पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करतात. परंतु त्यांचे पोट भरण्यासाठी आड येतो, तो बालकामगार कायदा. बालकामगारांना त्या

आज बाल कामगारविरोधी दिन : जिल्ह्यात हजारो बालमजूर कार्यरतनरेश रहिले - गोंदियाज्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते त्या घरातील लहान मुले पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करतात. परंतु त्यांचे पोट भरण्यासाठी आड येतो, तो बालकामगार कायदा. बालकामगारांना त्या कामावरून काढल्यानंतर त्यांच्या घराला आर्थिक आधार मिळेल, अशी योजना शासनाने तयार केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बालमजुरी कमी होताना दिसत नाही. आजही हजारो बालकामगार विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी प्रस्तावित शाळांचाही अजून थांगपत्ता नाही.राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाने १४ फेब्रुवारी २०१४ रोजी केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात २७६ बालमजूर आढळले आहेत. या बालमजुरांसाठी सहाय्यक कामगार कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला सात संक्रमण शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र हा प्रस्ताव अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. नवीन सत्र सुरू होण्यासाठी आठवडाही शिल्लक राहीलेला नाही, मग या २७६ बालमजुरांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या शाळा कधी सुरू होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.अत्यंत जोखीमेचे ठिकाण असलेले १८ उद्योग व ६४ प्रक्रिया यात १४ वर्षाखालील काम करणाऱ्या बालकांना शासन बालमजूर म्हणून संबोधते. परंतु १४ वर्षाखालील बालके कापड दुकानात किंवा इतर धोक्याच्या ठिकाणी काम करीत नसल्यास त्यांना बालमजूर म्हणून संबोधल्या जात नाही, किंवा त्यांच्यावर कारवाईसुद्धा करीत नाही. परंतु हॉटेल, तेंदूपत्ता, बेकरी, विटभट्टी किंवा कारखान्यात धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या बालमजुरांना ते काम करण्यापासून परावृत्त करण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयामार्फत प्रयत्न केले जातात. सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयाच्या माहिती प्रमाणे २८ जून २०१३ पर्यंत जिल्ह्यात १४७७ बालमजूर होते. या बालमजुरांसाठी इंडसच्या माध्यमातून ४० विशेष प्रशिक्षण देणाऱ्या शाळा होत्या. त्या सर्व शाळा बंद करून त्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या नावावर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल करण्यात आले. परंतु १४ फेब्रुवारी २०१४ रोजी केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात २७६ बालमजूर आढळले आहेत. या बालमजुरांच्या निर्मुलनासाठी गोंदिया तालुक्याच्या अदासी, सालेकसा, कुडवा, काचेवानी, तिरोडा, मुंडीकोटाच्या जमनानगर व घोगराच्या भीमनगरात संक्रमण शाळा उघडण्यात येणार आहेत. परंतु सत्र आठवडाभरात सुरू होणार असल्याने एवढ्या कमी वेळात या संक्रमण शाळांना मंजूरी व त्या सुरू करण्याची प्रक्रिया कशी होईल याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.जिल्ह्यात रेल्वेस्थानक परिसरात भिक्षा मागणाऱ्या व कचरा उचलणाऱ्या बालमजुरांची संख्या हजारोच्या घरात आहे. मात्र त्यांचे मालक कोण हे निर्धारीत नसल्यामुळे या बालमजुरीच्या निर्मुलनासाठी कामगार कार्यालयामार्फत प्रयत्नच केले जात नाही. मुंडीकोटा, घोगरा, सालेकसाचे बाबाटोली व गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर या बालमजुरांची संख्या अधिक आहे. या बालमजुरांचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात केले जाते. ज्यांचे पालक काम करीत नाही त्यांची मुले बालमजुरी करतात. ज्यांचे पालक काम करतात परंतु ते व्यसनाधीन आहेत त्यांची मुले बालमजुरी करतात. काही मुले हॉटेलातील चमचमीत खायला मिळेल या आशेने हॉटेलात बालमजुर म्हणून काम करतात.जिल्ह्यात हजारापेक्षा अधिक मुले बालमजुरी करतात. मात्र गोंदियातील सहाय्यक कामगार कार्यालयाकडे जिल्ह्यात फक्त २७६ बालमजूर असल्याची नोंद आहे.