तीन नवे निरीक्षक येणार : तिघांचे विनंती प्रस्ताव नामंजूर गोंदिया : महाराष्ट्र पोलीस कायदा कलम २२ (१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून पोलीस आस्थापना मंडळ-२ यांनी कायद्याप्रमाणे विहीत कालावधी पूर्ण झालेल्या नि:शस्त्र पोलीस निरीक्षकांच्या पदस्थापनेस मान्यता दिली आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील सात नि:शस्त्र पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश आहेत. विशेष म्हणजे एकूण आठ नि:शस्त्र पोलीस निरीक्षकांची नावे यादीत आहेत. मात्र त्यापैकी संजय शिवाजीराम देशमुख या नि:शस्त्र पोलीस निरीक्षकांना प्रशासकीय कारणांमुळे एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे सात नि:शस्त्र पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांना मान्यता मिळाली आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील नि:शस्त्र पोलीस निरीक्षक राजकुमार बालाजी केंद्रे यांची बदली सोलापूर ग्रामीणमध्ये, सुनील रामराव पाटील यांची नवी मुंबई, जयराज संभाजीराव रणवरे यांची ठाणे शहर, सुरेश दिनकर कदम यांची रत्नागिरी, किशोर मारूती धुमाळ यांची सातारा, संजीव दशरथ गावडे यांची रायगड व नामदेव विठ्ठल बंडगर यांची बदली रायगड येथे करण्यात आलेली आहे. तसेच एसीबीमधून नवीन दोन निरीक्षक जिल्ह्यात येणार आहेत. यात दिनकर आत्माराम ठोकरे व रोशन रधुनाथ यादव यांचा समावेश आहे. तर पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथील नि:शस्त्र पोलीस निरीक्षक सुरेश रामकृष्ण नारनवरे यांच्या विनंती अर्जावरून त्यांची बदली गोंदिया येथे करण्यात आली आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यातील तीन नि:शस्त्र पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे विनंती प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. यात मोहन कृष्णा खांदारे, प्रशांत बंडू भस्मे व मनोहर रामचंद्र दाभाडे यांचा समावेश आहे. उल्लेखनिय म्हणजे कोणत्याही स्थितीत १५ मे २०१७ पर्यंत त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे. पर्यायी किंवा बदलीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची वाट पाहण्यात येवू नये. बदली आदेशानंतर जे रूग्ण निवेदन किंवा गैरहजर राहतील, त्यांना त्यांच्या रूग्ण निवेदनाच्या तारखेपासून ‘स्थित कार्यमुक्त’ करावे व तसे आदेश त्यांच्या निवासस्थानी पाठवावे, असे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) यांनी दिलेले आहे. (प्रतिनिधी)
सात नि:शस्त्र पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 02:26 IST