शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
4
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
5
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
6
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
7
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
8
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
9
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
10
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
11
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
12
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
13
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
14
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
15
साखरपुडा झाल्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, म्हणाली "खूप वर्षांपासून"
16
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी
17
"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?
18
Sangli Murder: तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
19
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
20
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...

सात महिन्यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेस आली रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 05:00 IST

हावडा- मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावर दररोज दीडशेवर प्रवाशी गाड्या धावतात. तर शंभराहून अधिक मालगाड्या धावतात. गोंदिया जिल्हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून असल्याने गोंदिया रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजारावर प्रवासी ये-जा करतात. मात्र मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुभार्व झाल्यानंतर केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन घोषीत केला.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी १३२ प्रवाशांचा प्रवास : १५ पासून सुरू होणार आणखी गाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुळे मागील सात महिन्यापासून रेल्वेची प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर सुध्दा शुकशुकाट होता. पण आता सर्वत्र कोरोनाचा प्रादुभार्व आटोक्यात येत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे काही प्रवासी गाड्या सुरु केल्या आहे. मंगळवारी (दि.१३) तब्बल सात महिन्याच्या कालावधीनंतर गोंदिया-कोल्हापूर (महाराष्ट्र एक्सप्रेस) प्रथमच धावली. पहिल्याच दिवशी १३२ प्रवाशांनी प्रवास केला.हावडा- मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावर दररोज दीडशेवर प्रवाशी गाड्या धावतात. तर शंभराहून अधिक मालगाड्या धावतात. गोंदिया जिल्हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून असल्याने गोंदिया रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजारावर प्रवासी ये-जा करतात. मात्र मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुभार्व झाल्यानंतर केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन घोषीत केला. त्यानंतर कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सर्वच वाहतूक व्यवस्था बंद ठेवली. त्यामुळे प्रथमच रेल्वे सेवा देखील ठप्प झाली.त्यामुळे मागील सात महिन्यापासून गोंदिया रेल्वे स्थानकावर सुध्दा शुकशुकाट कायम होता. मात्र आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने सुध्दा टप्प्या टप्प्याने रेल्वे गाड्या सुरु केल्या आहे. १० ऑक्टोबरपासून विदर्भ एक्सप्रेस सुरु झाली.त्यानंतर मंगळवारपासून महाराष्ट्र एक्सप्रेस सुरु झाली. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पहिल्याच दिवशी १३२ प्रवाशांना घेवून महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हपूरकडे रवाना झाली.तब्बल सात महिन्याच्या कालावधीत प्रवाशांना रेल्वेने त्यांच्या नियोजीत ठिकाणी जात येत असल्याने आनंद झाला. रेल्वे विभागाकडून टप्प्याने रेल्वे गाड्या सुरु करण्यात येत असल्याने रेल्वे स्थानकावरील चहल पहल वाढली आहे.असे आहे गोंदिया ते नागपूर प्रवासाचे दरमहाराष्ट्र एक्सप्रेसने गोंदिया ते नागपूर प्रवास करण्यासाठी आरक्षीत तिकिटांचे वेगवेगळे दर आहेत. एसी व्दितीय श्रेणी ६४५ रुपये, एसी थ्री ४६० रुपये, व्दितीय श्रेणी स्लीपर १३५ रुपये, व्दितीय श्रेणी स्लीपर सीटींग ७० रुपये तिकिटाचे दर आहे. प्रवाशांना सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत तिकिट आरक्षीत करता येणार आहे.हावडा-पुणे स्पेशल १५ ऑक्टोबरपासूनरेल्वे विभागाने हळूहळू रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. १५ ऑक्टोबरपासून हावडा-पुणे-हावडा ही व्दि साप्ताहिक गाडी सुरु होणार आहे. ही गाडी १५ ऑक्टोबरला हावडा येथून सकाळी ८.२५ वाजता सुटेल. तर पुणे-हावडा ही गाडी १५ ऑक्टोबरल १५.१५ वाजता सुटेल. लवकरच पुन्हा गाड्या सुरु करण्यात येणार असून त्याची प्रवाशांना मदत होणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे