शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

गंभीर रूग्णांना दिले जीवदायी प्लाझ्माचे डोज,मिळाली संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

कोरोनावर अद्याप तरी काहीच औषध हाती आलेले नाही. अशात कोरोना हा तेवढाच धोकादायक व जीवघेणा ठरत आहे. डॉक्टरांकडून उपलब्ध औषधांनीच रूग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांसाठी आजघडीला प्लाझ्मा हेच जीवदायी शस्त्र डॉक्टरांच्या हाती आहे. आतापर्यंत प्लाझ्मा जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने रूग्णाच्या नातेवाईकांना नागपूरची धाव घ्यावी लागत होती.

ठळक मुद्देखाजगी रूग्णालयातील दोन रूग्ण : रक्त केंद्राकडे सहा बॅग प्लाझ्मा जमा

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांना जीवदायी ठरत असलेल्या प्लाझ्मा युनिटचे फायदे आता जिल्ह्यात दिसू लागले आहेत. येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर स्थितीतील दोन रूग्णांना प्लाझ्मा देण्यात आला आहे. परिणामी प्लाझ्मा युनिटचे कार्य सार्थकी लागत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.  कोरोनावर अद्याप तरी काहीच औषध हाती आलेले नाही. अशात कोरोना हा तेवढाच धोकादायक व जीवघेणा ठरत आहे. डॉक्टरांकडून उपलब्ध औषधांनीच रूग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांसाठी आजघडीला प्लाझ्मा हेच जीवदायी शस्त्र डॉक्टरांच्या हाती आहे. आतापर्यंत प्लाझ्मा जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने रूग्णाच्या नातेवाईकांना नागपूरची धाव घ्यावी लागत होती. त्यातही गरींबासाठी हे शक्य नसल्याने कित्येकांचा जीव गेला व मृतांची आकडेवारी १७० घरात आली आहे. यातूनच गोंदिया जिल्ह्यात प्लाझ्मा युनिट सुरू करण्याची मागणी केली जात होती. जिल्ह्यात नुकतीच मंगळवारी (दि.८) प्लाझ्मा युनिट सुरू झाली व आतापर्यंत चार डोनर्सने पुढाकार घेत प्लाझ्मा दान केले. विशेष म्हणजे, जिल्ह्यात प्लाझ्मा युनिट सुरू होताच त्याचा लाभही जिल्हावासीयांना होत असल्याचे दिसून येवू लागले आहे. बुधवारी (दि.९) येथील एका खाजगी रूग्णालयात गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णाला यातील एक युनिट देण्यात आले आहे. तर गुरूवारी (दि.१०) खासगी रूग्णालयातीलच गंभीर रूग्णाला युनिट देण्यात आल्याची माहिती आहे. एकंदरीत कोरोनामुळे रूग्णाचा जीव जावू नये यासाठी सुरू करण्यात आलेली प्लाझ्मा युनिट सार्थकी लागल्याचे दिसत आहे. 

रक्त केंद्रात सहा बॅग जमा ज्या चार डोनर्सकडून प्लाझ्मा घेण्यात आले आहेत त्यांच्यात एका डोनरकडून दोन बॅग घेतल्या जातात. अशाप्रकारे आठ बॅग जमा झाल्या होत्या. यातील दोन बॅग गंभीर रूग्णांना देण्यात आल्या आहेत. तर ए-पॉजिटिव्ह ग्रुुपच्या दोन,  ओ-पॉझिटिव्ह ग्रुपच्या तीन आणि बी-पॉझिटिव्ह ग्रुपची एक बॅग रक्त केंद्रात जमा आहे. यात मात्र, खासगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार ५५०० रूपये आकारले जातात. तर शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांना नि:शुल्क प्लाझ्मा दिला जात आहे. 

कोरोना योद्धांनी पुढे यावे कोरोना या जीवघेण्या आजारावर मात करणारा प्रत्येकच व्यक्ती आज कोरोना योद्धा ठरत आहे. तर हाच योद्धा अन्य रूग्णालाही या आजारावर मात करून जीवदान देणारा ठरत आहे. अशात कोरोनावर मात करून डिस्चार्ज होऊन २८ दिवस झालेल्या कोरोना योद्धाला प्लाझ्मा दान करता येतो. या प्लाझ्मा दानमुळे एखाद्या गंभीर रूग्णाचा जीव वाचविता येतो. त्यामुळे अशा या कोरोना योद्धांनी आता अन्य रूग्णांना जीवदान देण्यासाठी पुढे यावे असे गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, प्लाझ्मा युनिटचे प्रमुख डॉ. संजय चव्हाण, जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे यांच्यासह रक्तकेंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही कळविले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या