लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून सप्टेंबर महिना जिल्हावासीयांसाठी चांगलाच घातक ठरला. १ ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात तब्बल ५९६९ कोरोना बाधितांची नोंद झाली. तर ७७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.हा मागील सहा महिन्याच्या कालावधीतील कोरोना बाधितांच्या मृत्यूचा सर्वाधिक आकडा होय. त्यामुळे सप्टेंबर महिना कोरोनासाठी घातक ठरला. याच महिन्यात जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ७ हजाराच्या पार झाला.जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. मे महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पण कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंद होता. मार्च ते जुलै दरम्यान २८८ कोरोना बाधितांची नोंद झाली. तर ४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. मात्र ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट झाला. ऑगस्ट महिन्यात ११६९ कोरोना बाधितांची नोंद तर १६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यापासून कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्ण संख्येला ब्रेक लागेल असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला होता. मात्र सुध्दा पूर्णपणे फोल ठरला.जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांच्या आकडयाने नवा उच्चांक गाठला. या महिन्यात तब्बल ५९६९ कोरोना बाधितांची नोंद झाली. तर ७७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. थोडी दिलासा दायक बाब म्हणजे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने सप्टेंबरमध्ये साडेचार हजारावर कोरोना बाधित कोरोनावर मात केली.सप्टेंबरमधील पाच दिवस ठरले घातकसप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढल्याने रुग्ण संख्येत सुध्दा झपाटयाने वाढ झाली आहे. २३ सप्टेंबरला सर्वाधिक ३४० रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर २६ सप्टेंबर ३०८, १७ सप्टेंबरला २८५, २८ सप्टेंबर २६३ आणि १५ सप्टेबरला २५९ कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यामुळे सप्टेंबरमध्ये हे पाच दिवस रुग्ण वाढीसाठी सर्वाधिक घातक ठरले.
सप्टेंबर ठरला सर्वाधिक घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 05:00 IST
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. मे महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पण कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंद होता. मार्च ते जुलै दरम्यान २८८ कोरोना बाधितांची नोंद झाली. तर ४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. मात्र ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट झाला. ऑगस्ट महिन्यात ११६९ कोरोना बाधितांची नोंद तर १६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.
सप्टेंबर ठरला सर्वाधिक घातक
ठळक मुद्दे५९६९ रुग्णांची नोंद : ७७ कोरोना बाधितांचा मृत्यू, जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ७ हजार पार