शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

बचत गटाचे कर्ज परत मागणे तिच्या जिवावर बेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 05:00 IST

सचिव या नात्याने इंद्रकला दूधबर्वे आणि बचत गटातील अध्यक्ष व इतर महिलांनीसुद्धा तिला कर्जाची परतफेड करण्यासाठी बोलले परंतु गुंड प्रवृत्तीच्या बाबुलाल ढेकवारवार हा कर्जाची रक्कम खाऊन बसला आणि परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा तो रकमेचा भरणा करण्यास टाळाटाळ करू लागला. तेव्हा बचत गटाच्या इतर महिलांनी जेव्हा त्याच्या पत्नीला कर्जाची परतफेड करायला बोलायचे तेव्हा तो परतफेड न करता तुम्ही मला पैसे मागितले तर तुम्हाला मी जीवे मारून टाकीन अशा धमक्या सुद्धा देत होता.

विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सालेकसा तालुक्यातील बिंझली येथे एका सिंगाडे विकणाऱ्या महिलेच्या गावातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने खून केल्याची घटना २१ डिसेंबरला घडली. या घटनेचा आरोपी म्हणून सालेकसा पोलिसांनी बाबुलाल गोबरी ढेकवार (५२) याला अटक केली. त्यांनी पोलिसांजवळ खाेटी कहाणी रचली होती. आरोपीच्या पत्नीला बचत गटाचा कर्ज परत मागत असल्याने आरोपीने क्रोधित होऊन शिंगाडे विकणाऱ्या महिलेचा खून केल्याची बाब पुढे आली आहे. बिंझली येथील महिलांनी एकत्रित येऊन महिला बचत गट तयार केले होते. एखादा स्वयंरोजगार सुरु करावा म्हणून बचत गटाच्या माध्यमातून बँकेतून कर्ज काढले. त्यापैकी कर्जाची काही रकमेची उचल आरोपी बाबूलाल ढेकवार याच्या पत्नीनेही केली होती. परंतु दिलेल्या मुदतीत तिने कर्जाची रक्कम परत केली नाही. सिंगाडे विकणारी महिला इंद्रकला गुलाब दूधबर्वे ही बचत गटाची सचिव म्हणून काम पाहत होती. सचिव या नात्याने इंद्रकला दूधबर्वे आणि बचत गटातील अध्यक्ष व इतर महिलांनीसुद्धा तिला कर्जाची परतफेड करण्यासाठी बोलले परंतु गुंड प्रवृत्तीच्या बाबुलाल ढेकवारवार हा कर्जाची रक्कम खाऊन बसला आणि परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा तो रकमेचा भरणा करण्यास टाळाटाळ करू लागला. तेव्हा बचत गटाच्या इतर महिलांनी जेव्हा त्याच्या पत्नीला कर्जाची परतफेड करायला बोलायचे तेव्हा तो परतफेड न करता तुम्ही मला पैसे मागितले तर तुम्हाला मी जीवे मारून टाकीन अशा धमक्या सुद्धा देत होता. जो कोणी माझ्या वाटेवर येईल त्याला सोडणार नाही असा इशारासुद्धा दिला होता. बिंझली गावात कहार समाजाचे दहा-बारा कुटुंब वास्तव्यात असून त्यांनी गावातील एका तलावाच्या पायथ्याशी आपली वस्ती बसवली आहे. त्या नजीक असलेल्या बोडीत दरवर्षी शिंगाड्याची शेती करून आपल्या मूलभूत गरजा भागविण्याच्या प्रयत्न करता. यापैकी गुलाब दूधबर्वे यांनी गावातील शाळेच्या जवळ दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपला निवास थाटला. शिंगाडे विकणे हा त्यांच्या पारंपरिक व्यवसाय असून दरवर्षी तीन ते चार महिने शिंगाडे विकून आपला उदरनिर्वाह चालवितात. 

आरोपीला फाशीची शिक्षा द्या - संशयित आरोपी बाबूलाल ढेकवार याला पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर बाबूलाल ढेकवार याचे बयाण घेण्यात आले, तेव्हा त्याने एक खोटी कहाणी रचली. यामुळे कुटुंबीयांना बदनामीला सामोरे जावे लागले. या घटनेमागे नेमके कारण काय असावे, याच्या मुळापर्यंत जाण्याचे काम ‘लोकमत’ने केले. लोकमत प्रतिनिधीने पीडित परिवाराची भेट घेऊन गावातील अनेक लोकांशीसुद्धा चर्चा केली तेव्हा वेगळेच कारण पुढे आले. आरोपीने पोलिसांना खोटे बयाण दिल्याची बाब पुढे आली. गावकऱ्यांनी महिलेची बाजू घेत त्या नराधमाला फाशी , असेच मत व्यक्त केले.

 निवडणुकीच्या दिवशी साधला नेम - २१ डिसेंबरला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याचा दिवस होता. त्यामुळे त्या दिवशी त्यांनी गावाच्या जवळपास सिंगाडे विकून घरी परत येण्याच्या निर्णय घेतला. त्या दिवशी पती- पत्नी शिंगाडे विकायला सोबत न जाता पती दुसऱ्या गावात गेला आणि पत्नी जवळच्या पिपरटोला या गावी शिंगाडे विकायला गेली. तिच्या बत्तीस वर्षांच्या मुलाने पुलावरील मार्गाने नदीच्या पलीकडे सिंगाडे पोहोचवून दिले आणि इंद्रकला नाला ओलांडून गेली. निवडणुकीचे वातावरण असल्याने मुलगा घरी परत आला. गावात मतदान कार्यक्रम सुरू असताना बाहेर रस्त्यावर शुकशुकाट होता. या संधीचा फायदा घेत बाबूलाल ढेकवार याने दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिंगाडे विकून घरी परत येत असलेल्या महिलेला आधी तिच्या जवळच्या शिंगाडे कापण्याच्या कोयत्याने वार केला. नंतर डोक्याला दगडाने मारून खून केला. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी