अंकुश गुंडावार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या सुपोषित ग्रामपंचायत रिवार्ड स्पर्धेसाठी गोंदिया जिल्ह्यातून १३० पैकी ८१ ग्रामपंचायतींची अंतिमरीत्या निवड करण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतीअंतर्गत अंगणवाडी केंद्राचे काम अत्यंत उत्कृष्ट आहे व ज्या अंगणवाडी केंद्रांनी दिलेल्या निकषांची पूर्तता केली आहे, अशा ग्रामपंचायतींना पुरस्कार नामांकनासाठी निवडण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील एकूण ८ एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ८१ ग्रा.पं. मध्ये आता या अभियानांतर्गत विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्यात सातत्य ठेवण्यात येणार आहे. शासन निकषातील पूर्तता करणाऱ्या उत्कृष्ट मूल्यांकन प्राप्त अंगणवाडी केंद्राची निवड देशपातळीवरून होणार आहे. हे निकष पूर्ण करावे लागणार गंभीर तीव्र कुपोषण सॅमसह पाच वर्षांखालील मुलांमध्ये सुधारणा करणे सॅम बालकांची टक्केवारी राष्ट्रीय टक्केवारीपेक्षा कमी असणे अनिवार्य आहे. कमी वजन असलेल्या तीन वर्षाखालील मुलांमध्ये सुधारणा करणे एसयूडब्ल्यू बालकांची टक्केवारी राष्ट्रीयीकृत टक्केवारीपेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.
तीन महिने सातत्य ठेवादेशपातळीवरून एक हजार ग्रामपंचायतींमध्ये गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची या पुरस्काराच्या नामांकनासाठी निवड होण्याच्या दृष्टिकोनातून पुढील तीन महिने या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात केंद्राच्या निर्देशाप्रमाणे सातत्य ठेवावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम तसेच जिल्हा कार्यक्रमाधिकारी महिला बालविकास किर्तीकुमार कटरे यांनी केले आहे. तीन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये सुधारणा करणे, मध्यम तीव्र कुपोषण असलेल्या तीन वर्षांखालील मुलांमध्ये सुधारणा.
सारे काही सुपोषणासाठीअंगणवाडी केंद्रामध्ये सुपोषित ग्रामपंचायत अभियानांतर्गत एचसीएम आणि टीएचआरमध्ये बाजरीचा वापर, अंगणवाडी केंद्रात पोषण वाटिका पोषक बागांचा विकास, लाभार्थ्यांसाठी एचसीएम तयार करण्यासाठी त्याचे उत्पादन वापरणे, आहारातील विविधता आणि स्थानिक अन्नाचा वापर ई-पद्धतीद्वारे पोषण परिणाम सुधारण्याचा प्रयत्न राहणार आहे.
या निकषांची करावी लागेल पूर्तता
- गर्भधारणेमध्ये इष्टतम वजन वाढवणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी. नियमितपणे पूरक पोषण घेणाऱ्या महिला आणि स्तनदामातांची टक्केवारी, सहा महिने ते सहा वर्षे नियमितपणे पोषण आहार मिळणाऱ्या मुलांची टक्केवारी उल्लेखनीय असणे आवश्यक आहे.
- कार्यात्मक शौचालय सुविधा असलेली अंगणवाडी केंद्रे पिण्याचे पाणी व विद्युत जोडणी असलेली अंगणवाडी केंद्रे वैविध्यपूर्ण मेन्यू खाद्यपदार्थ, स्वच्छता, पौष्टिकतेची समृद्धता या निकषावर २१ दिवस पोषण आहारावरील निर्देशांक पूर्ण असलेल्या अंगणवाडी केंद्र नामांकनासाठी पात्र ठरणार आहेत.
"सुपोषित अभियान कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या सुपोषित ग्रामपंचायत रिवॉर्ड स्पर्धेसाठी गोंदिया जिल्ह्यातून ८१ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. या अभियानाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे."- किर्तीकुमार कटरे, जिल्हा कार्यक्रमाधिकारी, महिला बालविकास विभाग