शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

रेल्वे पार्सल कार्यालयाची सुरक्षा वाºयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:12 IST

येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे पार्सल कार्यालयातूनच प्रवाशांची ये-जा सुरू असते. हा प्रकार गेल्या कित्त्येक दिवसांपासून सुरू आहे.

ठळक मुद्देबेधडक ये-जा सुरू : रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे पार्सल कार्यालयातूनच प्रवाशांची ये-जा सुरू असते. हा प्रकार गेल्या कित्त्येक दिवसांपासून सुरू आहे. मात्र रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने यातून कधी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकमतने या कार्यालय परिसरात स्टिंग करुन या महत्त्वपूर्ण कार्यालयाची सुरक्षा कशी वाºयावर आहे, हे समोर आणण्याचा प्रयत्न केला.हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे. येथून दररोज हजारो प्रवाशी ये-जा करतात. मात्र सुरक्षात्मक बाबीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने येथे कधी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडे काही अनुचित घटना घडल्यानंतरही गोंदिया येथील स्टेशन व्यवस्थापनाने कसलाच धडा घेतलेला नाही. गोंदिया रेल्वे स्थानकालगत रेल्वेचे पार्सल कार्यालय आहे. विविध गाड्यांनी येणारे पार्सल येथे ठेवले जातात. त्यामुळे या कार्यालयाची सुरक्षाची तेवढीच चोख असायला हवी. परवानगीशिवाय येथे कुणालाही प्रवेश मिळायला नको. तसेच चोवीस तास येथे सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्याची गरज आहे. मात्र सध्यास्थितीत अशी कुठलीही व्यवस्था येथे नाही. होम फलाटावरुन काही प्रवाशी थेट या कार्यालयातूनच ये-जा करतात. त्यांना रेल्वे प्रशासनाकडून कुठलाही मज्जाव केला जात नाही. प्रवाशी म्हणून एखादी व्यक्ती येथे सहज प्रवेश करुन कुठलीही धोक्कादायक वस्तू सहजपणे नेऊन ठेऊ शकते. किंवा येथे असलेल्या एखाद्या वस्तूचे पार्सल देखील सहजपणे लांबवू शकत असल्याची बाब लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान पुढे आली. लोकमत प्रतिनिधीने रेल्वे पार्सल कार्यालयाच्या सुरक्षेचा मुद्दा रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी या कार्यालयाला भेट दिली. तसेच होम फलाटावरुन थेट या कार्यालयाच्या प्रवेशाव्दारातून आत प्रवेश केला. तसेच दुसºया दारातून सहजपणे बाहेर आले. या दरम्यान तेथे उपस्थित अधिकारी किंवा कर्मचाºयांने तुम्ही कोण, येथून प्रवेश कसा केला, येथून य-जा करण्यास मनाई आहे. असा कुठलेही प्रश्न केले नाही. त्यामुळे या कार्यालयात कार्यरत कर्मचारी सुरक्षेप्रती किती सजग आहेत, हे देखील दिसून आले.पार्सल कार्यालयातून शॉर्टकटहे रेल्वे स्थानक जंक्शन असून येथू नागपूर, बालाघाट, चंद्रपूर व रायपूर या चारही दिशांनी रेल्वे गाड्यांची सातत्याने ये-जा सुरू असते. मालगाड्यांसह विविध प्रवासी गाड्यांचा येथे थांबा आहे. इतवारी-रायपूर लोकल व मुंबई-गोंदिया सुपरफास्ट एक्सप्रेस या दोन्ही प्रवासी गाड्या येथे सकाळी १०.३० ते ११.३० वाजताच्या दरम्यान पोहोचतात. या दरम्यान काही प्रवासी मुद्दाम रेल्वेच्या पादचारी पुलाचा उपयोग न करता सरळ होमप्लॅटफॉर्मवर येतात.कर्मचारी बिनधास्तयेथे कार्यरत पार्सल विभागाचे कर्मचारी आपल्याच कार्यात गुंतले असल्याने ते या प्रकाराकडे सर्रास दुर्लक्ष करतात. पार्सल कार्यालयात असलेले सामान-साहित्य उघड्यावरच पडून राहात असल्याने चोरीची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारावर रेल्वे प्रशासनाने आळा घालणे गरजेचे आहे.पार्सलची सुरक्षा वाºयावरया पार्सल कार्यालयाचे एक दार होमप्लॅटफॉर्मच्या दिशेने उघडते. त्या दारातून पार्सल साहित्य कार्यालयात स्थानकातून पोहोचविले जाते. तर दुसरे दार स्थानकाबाहेर भाजीबाजाराच्या दिशेने उघडते. या दारातून पार्सल बाहेर पाठविले जाते. याच दारांनी प्रवासीसुद्धा होमप्लॅटफॉर्मवरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे गैरप्रकार करणारे, विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणारे किंवा प्लॅटफॉर्म तिकीट नसणाºयांसाठीसुद्धा हा मार्ग सोयीचा ठरत आहेत.पार्सल आल्यावर पोहोचविण्यासाठी व पार्सल बाहेर काढण्यासाठी पार्सल कार्यालयाचे दार उघडे ठेवले जाते. मात्र इतर वेळी हे दार बंद असते. दार उघडे असल्यावर जर कुणी तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते चुकीचे आहे. प्रवाशांना नेमून दिलेल्या मार्गानेच त्यांनी बाहेर पडावे अन्यथा रेल्वे प्रशासन कारवाई करेल.-रविनारायण कार, व्यवस्थापक, रेल्वे स्थानक, गोंदिया