शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

दैनिक व्यवहारातही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

विज्ञान विषयाचे अध्ययन-अध्यापन अधिक प्रभावशाली व आकर्षक होण्यासाठी ज्या शैक्षणिक संसाधनांची आशक्यता असते, त्यांची उपलब्धता प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये असणे गरजेचे असते. यावर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार मुल्यांकन होणे तेवढेच महत्वाचे वाटते. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आपल्या दैनंदिन व्यवहारात वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारावा असे प्रतिपादन माजी खासदार तथा शाळा संस्थापक डॉ.खुशाल बोपचे यांनी केले.

ठळक मुद्देबोपचे : तालुका विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : विज्ञान विषय अध्ययनात कोणत्याही काल्पनीक संकल्पनांना वाव नसतो. प्रत्येक घटनांना वैज्ञानिक आधाराची पाशर््वभूमी असते. त्यातून सत्यता प्राप्त होते. विज्ञान विषयाचे अध्ययन-अध्यापन अधिक प्रभावशाली व आकर्षक होण्यासाठी ज्या शैक्षणिक संसाधनांची आशक्यता असते, त्यांची उपलब्धता प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये असणे गरजेचे असते. यावर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार मुल्यांकन होणे तेवढेच महत्वाचे वाटते. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आपल्या दैनंदिन व्यवहारात वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारावा असे प्रतिपादन माजी खासदार तथा शाळा संस्थापक डॉ.खुशाल बोपचे यांनी केले.शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्यातील ग्राम मोहगाव बु. येथील परशुराम विद्यालयात आयोजित तालुका विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी (दि.२०) अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन पंचायत समितीचे सभापती माधुरी टेंभरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी टी.बी.भेंडारकर, सरपंच हेमलता हरिणखेडे, मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे, बी.आर. सीचे गटसमन्वयक एस.बी.खोब्रागडे, केंद्रप्रमुख वाय.एल.रंहागडाले उपस्थित होते.विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांतील ६० प्रयोगांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन करण्यात आले. मुल्यांकन गोरेगांव येथील जगत विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गजाधर भगत, डॉ.बाळकृष्ण परशुरामकर व डॉ.जे. आय.ठाकूर यांनी केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी भेंडारकर यांनी मांडले. संचालन विषयतज्ज्ञ सुनील ठाकुर यांनी केले. आभार विषयतज्ज्ञ ओमप्रकाश ठाकरे यांनी मानले. त्याचप्रकारे शनिवारी (दि.२१) पार पडलेल्या बक्षीस वितरण कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी भेंडारकर होते. मुख्य बक्षीस वितरक म्हणून मुख्याध्यापक कटरे तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख बी.बी.चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविक विषयतज्ज्ञ भाष्कर बहेकार यांनी मांडले. संचालन विषयतज्ज्ञ ओमप्रकाश ठाकरे यांनी केले. आभार गटसमन्वयक एस.बी.खोब्रागडे यांनी मानले. प्रदर्शनीसाठी बी.आर.सी. गोरेगांव येथील सर्व विषयतज्ज्ञ, विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.यांनी मारली बाजीविज्ञान प्रदर्शनीत प्राथमिक विद्यार्थी गटातून प्रथम क्रमांक मॉडेल कान्व्हेंटचा विद्यार्थी खुशाल चौधरी, द्वितिय क्रमांक शहीद जान्या-तिम्या जिल्हा परिषद हायस्कूलचा प्रणय हुमणे व तृतीय क्रमांक शहारवानी येथील स्व.ब्रिजलाल कटरे हायस्कूलचा अंकित पटले याने पटकाविला. माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक शहीद जान्या-तिम्या जिल्हा परिषद हायस्कूलचा महेंद्र चौरागडे, द्वितीय क्रमांक सोनी येथील एम.आय.पटेल हायस्कूलची विद्यार्थिनी उषा पटले व तृतीय क्रमांक मोहगाव येथील परशुराम विद्यालयातील विद्यार्थिनी भाग्यश्री पटले हिने पटकाविला. प्राथमिक शिक्षक गटातून ग्राम सिलेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षक एस.आर.साबळे, माध्यमिक शिक्षक गटातून ग्राम मोहगाव येथील परशुराम विद्यालयातील भारती खेमेंद्र कटरे तसेच प्रयोगशाळा सहायक गटातून ग्राम चोपा येथील रविंद्र विद्यालयातील प्रयोगशाळा सहायक एन. एम. भड यांनी तयार केलेल्या प्रतिकृतींची निवड करण्यात आली.

टॅग्स :Socialसामाजिक