शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

गावातील 7 घरांमध्ये भरते आहे शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असून, आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्ह्यात आता मोजकेच क्रियाशील रुग्ण उरले आहेत. नियंत्रणात असलेली ही स्थिती बघता शासनाकडून आता शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या भीतीने पालक आजही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास राजी नाही. अशात मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर मात्र तालुक्यातील ग्राम सिरपूर येथील जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी तोडगा काढला आहे.

ठळक मुद्देसिरपूर येथील आगळावेगळा उपक्रम : १४७ विद्यार्थी गिरवित आहेत धडे

 सुरेश येडेलोकमत न्यूज नेटवर्क रावणवाडी : जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असून आता शाळा उघडण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र पालकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण असून ते आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायला राजी नाहीत. अशात ग्राम सिरपूर येथे गावातील ७ घरांमध्ये शाळा भरविली जात असून तेथे शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. अशात गावातील १४७ विद्यार्थी यात शिक्षणाचे धडे गिरवित असून, सिरपूर येथील हा आगळावेगळा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा चांगलाच विषय बनला आहे. जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असून, आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्ह्यात आता मोजकेच क्रियाशील रुग्ण उरले आहेत. नियंत्रणात असलेली ही स्थिती बघता शासनाकडून आता शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या भीतीने पालक आजही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास राजी नाही. अशात मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर मात्र तालुक्यातील ग्राम सिरपूर येथील जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी तोडगा काढला आहे. शिक्षक गावातील ७ घरांमध्ये शाळा भरवून विद्यार्थ्यांना शिकवित आहेत. यात २० जूनपासून नियमितपणे १४७ विद्यार्थी उपस्थिती नोंदवित आहेत. विशेष म्हणजे, गावातील मुलांचा अभ्यास बुडू नये व त्यांची सुरक्षितता बघता गावकरीही आपल्या घरांत मुलांना शिकविण्यासाठी सहकार्य करीत आहेत. याअंतर्गत, एका घरात २१ विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वच विषयांचा अभ्यास करवून घेत असून आम्हालाही खूप आनंद येत असल्याचे विद्यार्थी बोलून दाखवित आहेत. खास बाब म्हणजे, या उपक्रमामुळे विद्यार्थी कोरोनापासून सुरक्षित असल्यामुळे पालकही संकोच न करता आपल्या पाल्यांना शाळेत पाठवित आहेत. सिरपूर येथील हा आगळावेगळा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला असून अन्य गावांतील नागरिकही असाच उपक्रम राबविण्याची मागणी करीत आहेत. 

मुलांच्या सुरक्षेसाठी घरातच भरविली शाळा  ‌वेगवेगळ्या घरांमध्ये शाळा भरविली जात असून यामागे मुलांची सुरक्षितता व सोबतच त्यांचा अभ्यास व्हावा हाच मुख्य उद्देश आहे. गावकरीही या उपक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी महत्वाची भूमिका निभावत आहेत. तर शिक्षकांचेही यात मोठे योगदान आहे. - अशोक मेंढे, सरपंच, ग्राम सिरपूर

शाळेत पाठविण्यास पालकांचा नकार - शिक्षण विभागाच्या आदेशानुसार कित्येक गावांमध्ये शाळा उघडण्यात आल्या आहेत. मात्र पालक कोरोनाच्या भीतीमुळे आजही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास नकार देत आहेत. तर ज्या शाळांमध्ये अभ्यास सुरू झाला आहे तेथे कोरोनापासून बचावासाठी ठोस बंदोबस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता अन्य गावांतही सिरपूरच्या धर्तीवरच घरांमध्ये शाळा भरवून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे. कोरोना नियमांचे पालन बंधनकारक - सिरपूर येथे ७ घरांमध्ये शाळा भरविली जात असून, यामुळे विद्यार्थी सुरक्षित आहेत तरीही त्यांना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच, प्रत्येकाला मास्क लावूनच यायचे आहे. शिवाय शारीरिक अंतराचे पालन करून त्यांना बसविले जात असून, सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. 

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या