शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मानधन वाढीसाठी शालेय स्वयंपाकीण आक्रमक; जि.प. समोर आंदोलन सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 15:37 IST

पोषण आहार बनविणाऱ्या महिलांची मागणी : किमान १० हजार रुपये मानधन करा

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या स्वयंपाकीण महिलांना किमान १० हजार रुपये मानधन देण्यात यावे, या मागणीला घेऊन स्वयंपाकीण महिलांनी मंगळवारपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले होते ते बुधवारी दुसऱ्या दिवशी सुरुच होते. 

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका शाळेत स्वयंपाकीण महिला इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या शाळेतील विद्यार्थ्यांकरिता मध्यान्ह शालेय पोषण आहार शिजविण्याच्या कामाव्यतिरिक्त शाळेतील वर्ग खोल्या, कार्यालय व शालेय परिसराची सफाईही करतात. त्या मोबदल्यात त्यांना फक्त दोन हजार ५०० रुपये मानधन दिले जात असून ते सुद्धा नियमित दिले जात नाही. एवढ्या मानधनात घरखर्च, मुलांचे शिक्षण करता येत नसून स्वयंपाकीण महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. त्यांना १२ महिने ऐवजी १० महिन्यांचे मानधन मिळते. शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम असताना मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहण्याचा दबाव टाकतात? शासन निर्णय फक्त ४ तास काम करा, असे असताना शाळा व्यवस्थापन समितीकडून त्यांना धमक्या दिल्या जातात. अशात स्वयंपाकीण महिलांना किमान १० हजार रुपये मानधन देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी स्वयंपाकीण महिलांनी मंगळवारी (दि. २४) जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष चंद्रा दमाहे, मनोज दमाहे, दिलीप चुटे, अनिता तांडेकर, दिवाकर शेंडे, गीता सेनवाने, सुनीता पाऊलझगडे, प्रतिभा बळगे, सरिता उके यांनी केले. 

या आहेत स्वयंपाकीण महिलांच्या मागण्या स्वयंपाकीण महिलांना १० महिन्यांऐवजी १२ महिन्यांचे नियमित मानधन देण्यात यावे, कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात यावे, किमान वेतन कायद्यांतर्गत किमान वेतन लागू करण्यात यावे, सेवेतून कमी करताना योग्य कार्यप्रणालीचा वापर करण्यात यावा, किमान १० हजार रुपये वेतन कायद्यां- तर्गत किमान वेतन लागू करण्यात यावे, शाळा व्यवस्थापन समितीचा दबाव कमी करण्यात यावा, एखाद्या शाळेत विद्यार्थी संख्या कमी झाल्याने त्या ठिकाणच्या स्वयंपाकीण महिलेस इतर ठिकाणी काम देण्यात यावे.

 

टॅग्स :gondiya-acगोंदिया