शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
4
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
5
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
7
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
8
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
9
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
10
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
11
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
12
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
13
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
14
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
15
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
16
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
17
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
18
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
19
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
20
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

जिल्हा ग्रीन झोनमध्ये असून कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसताच अशांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले जात आहे. त्यांचे स्वॅब नमुने घेवून ते तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहे. आठवडाभरापूर्वी तामीळनाडू येथील एक ट्रक चालक सामान सोडण्यासाठी गोंदिया येथे आला होता.

ठळक मुद्देजिल्हावासीयांना दिलासा : ३२ दिवसात नवीन रुग्णांची नोंद नाही, कोरोना उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तामीळनाडू येथील एक ट्रक चालक आठवडाभरापूर्वी गोंदिया येथे सामान सोडण्यासाठी आला होता. हा ट्रक चालक गोंदिया येथून तामीळनाडूला परत गेल्यानंतर त्याची तिथे आरोग्य तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोंदिया येथे त्याच्या संपर्कात आलेल्या १० जणांना आयसोलेशन कक्षात दाखल करुन त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला असून या सर्व १० जणांचे स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.जिल्हा ग्रीन झोनमध्ये असून कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसताच अशांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले जात आहे. त्यांचे स्वॅब नमुने घेवून ते तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहे. आठवडाभरापूर्वी तामीळनाडू येथील एक ट्रक चालक सामान सोडण्यासाठी गोंदिया येथे आला होता. सामान सोडून तो तामीळनाडू येथे परत गेल्यानंतर त्याची तिथे तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. यानंतर तेथील पोलीस अधीक्षकांनी ही माहिती गोंदिया पोलीस विभागाला दिली. ही माहिती प्राप्त होताच या ट्रक चालकाच्या गोंदिया येथे संपर्कात आलेल्या १० जणांना आरोग्य विभागाने जिल्हा क्रीडा संकुलातील आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. त्यांचे स्वॅब नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल मंगळवारी (दि.१२) जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून या सर्व १० जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी सांगितले.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातून आत्तापर्यंत एकूण ३३६ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ३२८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ८ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यात मागील ३२ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळेच जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग,पोलीस प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे.आयसोलेशन कक्षात ६३ जणकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसताच अशा व्यक्तींना आयसोलेशन कक्ष आणि शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल केले जाते. सध्या गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील ६३ जणांवर उपचार सुरू आहे. तर सहा क्वारंटाईन कक्षात ६० जण उपचार घेत आहेत. यात एम. एस. आयुर्वेदिक कॉलेज कुडवा गोंदिया १७, चांदोरी ५, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा ४, उपकेंद्र बिरसी ७, समाज कल्याण निवासी शाळा डव्वा २ आणि शासकीय आश्रमशाळा इळदा २८ असे एकूण ६० व्यक्तीं उपचार घेत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या