शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एकाच पावसाने पुलावरील स्लॅब गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 23:35 IST

आमगाव तालुक्यातील बोरकन्हार-भजेपार मार्गावरील पुलाचे स्लॅब पहिल्याच पावसाने वाहून गेला. दोन महिन्यापूर्वीच तयार केलेला पुलाची अवस्था दयनिय झाल्याने बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : आमगाव तालुक्यातील बोरकन्हार-भजेपार मार्गावरील पुलाचे स्लॅब पहिल्याच पावसाने वाहून गेला. दोन महिन्यापूर्वीच तयार केलेला पुलाची अवस्था दयनिय झाल्याने बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत बोरकन्हार ते भजेपार मार्गाचे डांबरीकरणाचे व पुलाचे काम तिरोडा येथील कंत्राटदाराला देण्यात आले होते. या पुलाचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण करायचे होते.त्यानुसार कंत्राटदाराने एप्रिल-मे महिन्यात काम पूर्ण केले. याच मार्गावरुन एक मोठा नाला वाहतो. त्या नाल्यावर वाहतुकीसाठी जुना पूल होता. मात्र जुना पूल जीर्ण झाला होता. नवीन पुलाचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले होते. पण पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने नवीन पूल तयार न करता जुन्याच पुलावर सिमेंट-कांक्रीटचा थर चढवून काम केले. थातूरमातूर काम केल्याने पहिल्याच पावसात पुलाची ऐसीतैशी होऊन पुलावरील स्लॅब पूर्णपणे उखडले. पुलावरील काँक्रीटचे थर एकावर एक झाल्याने या मार्गावरुन वाहने चालविणे कठीण झाले आहे. २६ जुलैला रात्री उपसरपंच कैलाश बहेकार हे दोन सहकाऱ्यांसह या पुलावरुन जात असताना झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावले. पुलाची स्थिती बिकट झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही याची दखल घेवून पुलाची दुरूस्ती केली नाही. त्यामुळे या पुलावर केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भजेपारवरुन आमगावकडे जाणाऱ्या प्रवाशांना हा मार्ग जवळ असल्याने याच मार्गावर सर्वाधिक वर्दळ असते. दोन महिन्यापूर्वीच लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या पुलाची अल्पावधीत ही अवस्था झाल्याने बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. पुलाच्या बांधकामाची चौकशी करुन कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी भजेपारचे सरपंच सखाराम राऊत, उपसरपंच कैलाश बहेकार व ग्रा.पं.सदस्यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस