शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

सालेकसा तालुक्यात भाजपचे पाच तर काँग्रेसचे चार ग्रा.पं.वर वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाच ग्रामपंचायतींवर आणि ...

ठळक मुद्देदावे-प्रतिदाव्यांना विराम, पोवारीटोलात काँग्रेस-भाजप दोन्हींचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाच ग्रामपंचायतींवर आणि काँग्रेस पक्षाला चार ग्रामपंचायतींवर आपला सरपंच-उपसरपंच निवडून सत्ता स्थापन करण्यात यश आले. सरपंच-उपसरपंच निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांच्या दावे-प्रतिदाव्यांना विराम लागला आहे. तर, भाजप-काँग्रेस वगळता इतर पक्ष या निवडणुकीत बॅकफूटवर गेलेले दिसून आले. पोवारीटोला ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या सत्ता स्थापनेच्या खेळीत अखेर काँग्रेसला यश आले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत या निवडणुकीत काँग्रेसच्या ताब्यात गेली.ज्या नऊ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झालेली होती, त्यामध्ये कावराबांध, कोटजंभुरा, मुंडीपार, कारूटोला आणि पाऊलदौना या पाच ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच-उपसरपंच निवडून आले आहेत. तर कोटरा, सातगाव, मानागड आणि पोवरीटोला या चार ग्रामपंचायतींवर काँग्रेस आपले सरपंच-उपसरपंच निवडून आणण्यात यशस्वी झाले आहे. पोवारीटोला ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची निवडणूक होताना काँग्रेस चार आणि भाजप तीन असे सदस्य निवडून आले होते. परंतु, आपल्याला सरपंचपद मिळावे म्हणून एका महिला सदस्याने भाजपशी हातमिळवणी करून सरपंचपदावर जाण्यासाठी अर्ज केला. शेवटी, काँग्रेसने त्या सदस्यांसमोर आधी नकार दिला होता, परंतु सत्ता जाताना पाहताच त्याच महिला सदस्याला आपले समर्थन दिले व सरपंच-उपसरपंचपद आपल्या गोटात आणण्यात यश मिळविले. परंतु, त्या महिला सदस्याने भाजपचे सदस्यत्व स्वीकारून भाजपकडून अर्ज भरला. त्यामुळे भाजप आता त्यावर आपला दावा करीत आहे. आता सर्वांचे लक्ष गाव विकासाचा गाडा खेचण्याकडे लागले आहे. 

ग्रामपंचायतनिहाय निवडून आलेले सरपंच-उपसरपंचग्रामपंचायत              सरपंच-        उपसरपंच                 पक्षकावराबांध-    बद्रीप्रसाद दसरिया -चैनसिंह मच्छिरके            भाजपकोटजमुरा -       शर्मिला माहुले- जितेंद्र अग्रवाल               भाजपपोवारीटोला -    छाया चौधरी- गणेश मेश्राम                   काँग्रेसमुंडीपार-       चेतनलाल हटोले- योगेश्वरी बसोने           भाजपपाऊलदौना-     भरत वट्टी- महेश लिल्हारे,                      भाजपसातगाव-        नरेश कावरे- अफरोज पठाण                 काँग्रेसकारुटोला-     उमराव बोहरे- बुधराम जिंदाकूर               भाजपकोटरा-         सीमा कोटांगले-नरेंद्र दोनोडे                  काँग्रेसमानागड-        वनिता सिरसाम-राजेश अडमे                 काँग्रेस

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच