शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

रेल्वे कर्मचाऱ्यांचा अरेरावीपणा

By admin | Updated: January 9, 2017 00:55 IST

नागपूर ते गोंदिया दरम्यान हजारोच्या संख्येत मासिक पासधारक दररोज रेल्वेने प्रवास करतात. अशात

प्रत्येकी ४०० रूपये दंड : मासिक पासधारकांना तीन तास ठेवले डांबून गोंदिया : नागपूर ते गोंदिया दरम्यान हजारोच्या संख्येत मासिक पासधारक दररोज रेल्वेने प्रवास करतात. अशात बुधवार (दि.४) एक्सप्रेस गाडी गोंदियाच्या प्लॅटफॉर्म-५ वर थांबताच फलाटावरच सहायक वाणिज्य व्यवस्थापक जायस्वाल यांच्या मार्गदर्शनात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी फलाटावरच मासिक पारधारकांना पकडून त्यांच्याशी अरेरावीपणा केला. तसेच मासिक पासधारक म्हणजे विनातिकीट असल्याचे म्हणत त्यांच्याकडून प्रत्येकी ४०० रूपयांचा दंड वसूल केला. या घटनेत ज्या मासिक पास धारकांनी दंड देण्यास नकार दिला त्या प्रवाशांसह रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हुज्जत घालून अपमानित केले व तीन तासपर्यंत कार्यवाहीच्या नावे खोलीत डांबून ठेवल्याचे मासिक पासधारक प्रवाशांनी सांगितले. मासिक पासधारक आरक्षित डब्यात बसल्याची शिक्षा म्हणून दंड स्वरूपात ४०० रूपये द्या, नंतरच येथून जा, अशी तंबी त्यांना देण्यात आली. अनेकांनी दंडाची रक्कमही भरली. ज्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांची मात्र चांगलीच फजिती झाली. या प्रकारामुळे मासिक पासधारकांनी रेल्वे प्रशासनावर रोष व्यक्त केला. नागपूर-गोंदियापर्यंत हजारोच्या संख्येत मासिक पासधारक अपडाऊन करतात. यात शासकीय, निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जनरल डब्यात इतर प्रवाशांची गर्दी राहत असल्याने मासिक पासधारक आरक्षित बोगीतून प्रवास करतात. मासिक पासधारकांसाठी वेगळ्या बोगीची व्यवस्था करावी, अशी मागणी खूप जुनी असूनही रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे आरक्षित बोगीतून त्यांना प्रवास करावा लागतो. बुधवारी ११.१५ वाजता गाडी फलाटावर थांबताच तिकीट तपासणीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाडीतून उतरणाऱ्या सर्वांचीच चौकशी केली. मासिक पारधारक सांगताच ४०० रूपये दंड द्या, मगच चालते व्हा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशीे तंबी देण्यात आली. त्यामुळे आधीच उशीर झालेल्या पासधारकांनी ४०० रूपये देवून आपली सुटका करून घेतली. मात्र ज्यांच्याकडे पैसे नव्हते व ज्यांनी देण्यास विरोध केला त्यांना जवळपास तीन तासपर्यंत डांबण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले. दरम्यान त्यांनी सोडून देण्याची विनंती केली, मात्र सहायक वाणिज्य व्यवस्थापक जायस्वाल काहीही ऐकायला तयारच नव्हते. कारवाईला सामोरे गेलेल्या प्रवाशांमध्ये जि.प. पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, मेडिकल कॉलेजचे विभागप्रमुख, पाटबंधारे विभागाचे अधिकारी-कर्मचारी, जिल्हा रूग्णालयातील अधिकारी-कर्मचारी, बँक कर्मचारी आदी होते. या सर्वांना शिविगाळ व धक्काबुक्की करून रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपली निर्दयता दाखविली. या घटनेमुळे रेल्वेचे कर्मचारी प्रवाशांना कशी वागणूक देतात याची प्रचिती येते. सदर मासिक पारधारकांनी ग्राहक न्यायालयात प्रकरण दाखल करणार असल्याचेही सांगितले आहे. (प्रतिनिधी) एमएचटीधारकांकडून रोजच वसुली ४नागपूर ते गोंदियादरम्यान प्रवास करणाऱ्या मासिक पासधारकांकडून गाडीतही रेल्वेचे कर्मचारी एकदोन दिवसाआड आरक्षित बोगीत बसले म्हणून दंड स्वरूपात पैसे वसूल करतात. यापैकी अनेकांना पैशाची पावतीसुद्धा दिली जात नाही व पैसा खिशात घातला जातो. तर अनेक प्रवाशांकडून पैसे घेवून एकच कमी रकमेची पावती दिली जाते. याकडे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.