शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

महिलांशी असभ्य वागणूक

By admin | Updated: January 25, 2015 23:18 IST

तिरोडा तालुक्यातील सोनेगाव येथील सेवा सहकारी संस्थेमार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. येथे गोंदियावरून आलेल्या कर्ज वसुली अधिकाऱ्यांनी महिलांसह

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील सोनेगाव येथील सेवा सहकारी संस्थेमार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. येथे गोंदियावरून आलेल्या कर्ज वसुली अधिकाऱ्यांनी महिलांसह असभ्य वागणूक करून घाणेरड्या शब्दांचा वापर करून अपमानित केल्याचा प्रकार घडला.सोनेगाव येथील सेवा सहकारी संस्था ही गावातीलच शेतकऱ्यांची असून सभासदही शेतकरीच आहेत. या संस्थेवर सचिव, अध्यक्ष व संचालक मंडळाची देखभाल असते. संस्थेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदियाकडून कर्ज पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांनी नियमित कर्जाचा भरणा केला असतानाही काही शेतकऱ्यांना ३० आॅक्टोबर २०१३ च्या कर्ज वसुली मागणीचे नोटीस आता दिले. दोन वर्षांनंतर नोटीस कशा आल्या, याचा शेतकऱ्यांना धक्काच बसला. १६ जानेवारी २०१५ रोजी सायंकाळी जुनी मागणी नोटीस देण्यात आली. यानंतर १७ जानेवारी २०१५ रोजी गोंदियावरून आलेले बँकेचे वसुली अधिकारी मेश्राम, निमजे, सचिव हरिणखेडे, अध्यक्ष व इतर कर्मचारी वर्गांनी गावातील केशवराव परसराम बावणकर, कोढेश्वर लोकचंद भगत, मनोहर रतिराम बावणकर, व्यंकटराव दशाराम रहांगडाले यांच्या घरांची जप्ती केली. त्यांच्या घरातील तांदूळ, धानाची पोती, सोफा, टीव्ही आदी सामान-साहित्यांची उचल करून ट्रक्टरमध्ये घातले. दरम्यान गावातील महिलांनी ट्रक्टरवर चढून सामान नेण्यास मनाई केली व चक्क ट्रक्टरवरच बसून राहिले. शेतकरी कोदू रहांगडाले, जितेंद्र भगत, बंशीलाल रहांगडाले, गोविंद भगत, बालचंद गौतम, मानिक भगत, मोगीलाल भगत, दिनदयाल रहांगडाले यांच्यावर थकीत कर्ज किंवा फारसे मोठे कर्ज नसतानाही वसुली अधिकारी त्यांच्या घरी जप्तीसाठी गेले. दरम्यान वसुली अधिकाऱ्यांनी महिलांशी असभ्य वागणूक केली. घाणेरडे शब्द वापरून महिलांना अपमानित केले. यावर महिलांनीसुद्धा त्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. शेतकऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांना जप्तीचे आदेश मागितले असता त्यांनी पळ काढला. या प्रकाराने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.यानंतर शेतकरी तिरोडा तालुका सहायक निबंधक गोस्वामी यांच्या कार्यालयात विचारपूस करण्यासाठी गेले. या शेतकऱ्यांनी आरआरसी व सेवा सहकारी संस्था सोनेगाव येथे कसलाही व्यवहार केला नाही. जप्ती व वसुलीचे अधिकार त्यांना नाहीत. त्यांची वसुलीची पद्धत चुकीची असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. तसेच आपण चौकशी करून सचिव व अध्यक्षावर कारवाई करू, असे सांगितले. (प्रतिनिधी)