शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी रोवणीला पडल्या भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:57 IST

मागील पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणी झालेल्या शेतीला भेगा पडल्या आहेत. तर पावसाअभावी धान करपण्याच्या मार्गावर आहे. १४ आॅगस्टला झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

ठळक मुद्देशेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत : तालुक्यात दुष्काळ सदृश स्थिती, पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : मागील पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणी झालेल्या शेतीला भेगा पडल्या आहेत. तर पावसाअभावी धान करपण्याच्या मार्गावर आहे. १४ आॅगस्टला झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आता धान भरण्याच्या स्थितीत असताना पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी संकटात आले आहेत.जिल्ह्यातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी,धानोरी, बेहळीटोला, थाडेझरी, बोळुंदा, मुरपार, लेंडेझरी, चिचटोला, मुंडीपार या गावातील शेतकरी मागील पंधरा दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. कोसमतोंडी, धानोरी, बोळुंदा, थाडेझरी, बेहळीटोला येथे मागील वर्षीसुद्धा दुष्काळी परिस्थिती होती. या गावातील शेतकऱ्यांनी ८० टक्के धानाची रोवणी केली नव्हती. मात्र या शेतकऱ्यांना शासनाने कुठलीच नुकसान भरपाई दिली नाही.यावर्षी या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने धानाची रोवणी केली. मात्र पावसाने पुन्हा दगा दिल्याने मागील वर्षी सारखेच यावर्षी पुन्हा दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित आहे. सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांसह कोरडवाहू शेतकऱ्यांनी रोवणीची कामे लगबगीने पूर्ण केली.सुरूवातीला झालेल्या संततधार पावसामुळे शेतकरी सुखावले होते. लवकर धानाचे पीक जोमदार यावे, यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खताचे डोजही दिले. परंतु मागील पंधरा दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने धानपिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.वाढत्या तापमानामुळे धानाच्या बांध्या कोरड्या पडत असून धान वाळत असल्याचे चित्र आहे. शेतातील रोवणीला भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या आठ दहा दिवसात पाऊस न झाल्यास दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.सिंचन प्रकल्पांवर भिस्तसध्या हलके धान निघण्याच्या मार्गावर आहे तर जड धानाला एका पाण्याची गरज आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे. ते शेतकरी धानाला पाणी देत आहे. तर धानपिके संकटात आल्याचे पाहून सिंचन प्रकल्पातील पाणी सोडले जात आहे. मात्र शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याची ओरड आहे. तर काही शेतकऱ्यांची भिस्त पूर्णपणे या सिंचन प्रकल्पांवर असल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांची दिशाभूलमागील वर्षी कोसमतोंडी, धानोरी, बोळुंदा, थाडेझरी, बेहळीटोला या पाच गावात ८० टक्के धानाची रोवणी पावसाअभावी झाली नव्हती. या गावातील शेतकऱ्यांनी अनेकदा तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर या पाच गावातील सर्वे करण्याचे निर्देश तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना देण्यात आले. मात्र तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी शेतीचे पंचनामे शेतशिवारात जाऊन न करता टेबलावर बसून सर्वे करुन शासनाकडे पाठविले. यामध्ये शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून शेतकरी वंचित राहिले.कर्मचाऱ्यांवर कारवाहीची मागणीमहसूल आणि कृषी विभागाच्या चुकीच्या अहवालामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील अनेक शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस