शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
3
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
4
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
5
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
6
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
7
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
8
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
9
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
10
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
11
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
12
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
13
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
14
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
15
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

आजारी ‘द्वारका’ मृत्युशय्येच्या वाटेवर

By admin | Updated: September 10, 2015 02:19 IST

तिच्याकडे पाहताच वाटायला लागते, दोन वर्षापूर्वी सुंदर व ठणठणीत दिसणारी द्वारका आता अगदी हाडांचा सांगाडा बनली आहे.

सागर काटेखाये  साखरीटोलातिच्याकडे पाहताच वाटायला लागते, दोन वर्षापूर्वी सुंदर व ठणठणीत दिसणारी द्वारका आता अगदी हाडांचा सांगाडा बनली आहे. होय, अगदी हाडांचा सापडाच. विश्वास बसणार नाही, पण खरोखरच ती अगदी मृत्यूच्या वाटेवर उभी आहे. द्वारकाची ही अवस्था एका भयंकर आजाराने केली आहे. सोबतच दारिद्र्याचे जगणे तिच्या वाट्याला आले आहे. ही घटना आहे एका छोट्याशा गावातील द्वारकाची. देवरी तालुक्यातील साखरीटोल्यापासून १० किमी अंतरावरील ओवारा येथील द्वारका घनश्याम मौजे या तरूणीची. ती एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. मागील दोन वर्षांत तिच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला विशिष्ट प्रकारची सूज आली व ती सारखी वाढत आहे. पाहता-पाहता रोगामुळे तिचे अन्न पाणी सुटले. सुंदर दिसणारी व ठणठणीत शरीरयष्टीची द्वारका शरीराने कमकुवत होऊन केवळ हाडे मात्र उरली आहेत. या रोगामुळे ती हळूहळू मृत्यूच्या वाटेवर जात आहे. मात्र उपचार करण्यासाठी एक रुपयासुद्धा हाती नाही. गरिबी तर पाचवीला पूजलेलीच. वडील तीन वर्षांपूर्वीच वारले. आई केशर मौजे मजुरी करून पोट भरते. जमीन नाही, भूमिहीन आहे. चार मुली व एक मुलगा असून मोलमजुरीच्या भरवशावर केशर संसाराचा गाडा हाकत आहे. द्वारका बारावीपर्यंत शिकली. रिकाम्या वेळात आईला हातभार म्हणून तीसुध्दा मातीच्या कामाला जात होती. परंतु आजारामुळे आता ती पडून आहे. लहान बहिणी व भाऊ जि.प.च्या शाळेत शिक्षण घेत आहेत. हातात पैसा नसल्याने साध्या डॉक्टरांकडे दाखविले, मात्र रोगाचे निदान झाले नाही. औषधोपचार करू शकत नाही. मोठ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर पैसे खूप लागतात. त्यामुळे तरुण मुलगी मृत्यूशय्येच्या वाटेवर असूनही आई काहीही करू शकत नाही, अशी केविलवाणी परिस्थिती झाली आहे. म्हणतात ना ज्याच्याजवळ धन असते तर खाणारे नसतात व धन नसले तर खाणारेच खाणारे असतात, तर हे काही खोटे नाही. महागाईच्या काळात गरिबीच्या तडाख्यात औषधोपचार कोठून करणार? असा प्रश्न द्वारकाच्या आईला पडला आहे. जगात दु:खाला पारावार नाही. ऐनकेन कारणाने माणूस दु:खी असतो. पण असेही दु:ख माणसाच्या वाट्याला येवू नये म्हणजे झाले. जन्म आहे तर मृत्यूही आहेच. मात्र ऐन तारुण्यात होणारा मृत्यू हृदयाला चटके लावून जातो. दारिद्र्याचे जीवन जगणाऱ्या माणसाला हे सहन केल्याशिवाय पर्याय नसते. पण, म्हणतात ना अंधारातूनच प्रकाशाची किरणे दिसतात, झाले तसेच! सामाजिक कार्यकर्त्या व माजी जि.प. समाजकल्याण सभापती सविता पुराम दोन दिवसांपूर्वी ओवारा येथे पंतप्रधान विमा योजनेच्या कामासाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांना द्वारकाच्या आजाराविषयी माहिती मिळाली व लगेच त्यांनी सरपंच कमल येरणे यांना सोबत घेऊन द्वारकाचे घर गाठले. तिची अवस्था पाहून तिला उपचाराकरिता केटीएच गोंदियाला नेण्याची तयारी दर्शविली. आ. संजय पुराम यांना सांगून मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवून देण्याची हमी सदर प्रतिनिधीशी बोलताना दिली. त्यामुळे सविता पुराम यांच्या रुपाने मदतीचे हात द्वारकापर्यंत पोहचले असले तरी सामाजिक संस्थांनी द्वारकाच्या उपचाराकरिता पुढे यावे, असे वाटते.